पोस्ट्स

मार्च, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विनोबा’ ॲप अंतर्गत जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय विजेत्या शिक्षकांचा सन्मान

इमेज
नंदुरबार जि प्रतिनिधी: राम सोनवणे  जिल्हा परिषद नंदुरबार व ओपन लिंक्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या ‘विनोबा’ ॲप उपक्रमांतर्गत उत्कृष्ट शैक्षणिक पोस्ट व नाविन्यपूर्ण उपक्रम सादर करणाऱ्या शिक्षकांचा जिल्हास्तरीय गौरव समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात ‘पोस्ट ऑफ द मंथ’ (POM) व ‘मॉर्निंग असेंब्ली’ (Morning Assembly) या उपक्रमांमध्ये जिल्हास्तरीय तसेच तालुकास्तरीय उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी जिल्हा परिषद नंदुरबारचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. नमन गोयल (भा. प्र. से.) यांच्या हस्ते विजेत्या शिक्षकांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमास जिल्हा परिषद नंदुरबार उप मुख्य कार्यकारी अधिकारी  श्री. गणेश मोरे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मा. भानुदास रोकडे तसेच उपशिक्षणाधिकारी मा. डॉ. युनुस पठाण यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘पोस्ट ऑफ द मंथ’ जिल्हास्तरीय विजेते म्हणून सपना हिरे (जि.प. शाळा अंबापूर), शितल शिंदे (जि.प. शाळा बुधावल) आणि महेंद्र इशी (जि.प. शाळा विखरण) यांना जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात विन...

वेल्हाणे माध्यमिक विद्यालय 2009 बॅचचा माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन उत्साहात

इमेज
धुळे जि. प्रतिनिधी : राज सोनवणे माध्यमिक विद्यालय, वेल्हाणे ता. जि. धुळे येथे सन 2009 मध्ये दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा माजी विद्यार्थ्यांचा सस्नेह मेळावा मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडला. अनेक वर्षांनंतर एकमेकांना भेटण्याची संधी मिळाल्याने माजी विद्यार्थ्यांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. या मेळाव्यास तत्कालीन मुख्याध्यापक श्री. व्ही. एस. सोनवणे तसेच शिक्षकवृंद श्री. आर. एस. सोनवणे, श्रीमती पी. एन. पाटील, श्री. ए. एस. पाटील, श्री. एल. डी. पाटील, श्री. एम. डी. अहिरे आणि श्री. निवृत्ती मराठे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उपस्थित शिक्षकांचा माजी विद्यार्थ्यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील अनेक आठवणींना उजाळा दिला. बालपणातील शिक्षण, वर्गातील खोड्या, मित्रांमधील भांडणं, मस्करी, खेळ आणि त्या काळातील अविस्मरणीय क्षण यांची मनमोकळेपणाने आठवण काढण्यात आली. अनेक वर्षांनंतर पुन्हा एकत्र आल्याने जुन्या मैत्रीचे बंध अधिक दृढ झाल्याचे भावनिक चित्र या मेळाव्यात पाहायला मिळाले. यावेळी शिक्षकांनीही विद्यार्थ...

दोंडाईचा येथील घरफोडी प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीस मुद्देमालासह अटक करून गुन्ह्याचा उलगडा केला आहे.

इमेज
धुळे जि.प्रतिनिधी : राज सोनवणे  दि. 29 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 4 ते रात्री 8.30 वाजेदरम्यान फिर्यादी ओमप्रकाश पंडीत सोनवणे (रा. राऊळ नगर, संतोषी माता मंदिराजवळ, दोंडाईचा) यांच्या राहत्या घरातून अज्ञात चोरट्याने सुमारे 47 हजार रुपयांचे सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरी केली होती. याप्रकरणी दोंडाईचा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 93/2026 नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 305 (अ), 331 (3), 331 (4) अंतर्गत घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा, धुळे करीत असताना दि. 13 मार्च 2026 रोजी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गोपनीय माहिती मिळाली की, या गुन्ह्यातील आरोपी राजगुरु मोहन पाटील (वय 20, रा. महादेवपुरा, दोंडाईचा ता. शिंदखेडा जि. धुळे) हा चोरीचा मुद्देमाल विक्रीसाठी दोंडाईचा येथील नंदुरबार चौफुली परिसरात थांबलेला आहे. माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. सखोल चौकशीत त्याने घरफोडी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून सुमारे 18 हजार रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले. यामध्ये 2.510 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, नथ, 3.60...

नंदुरबार : चिंचपाडा वनपरिक्षेत्रात नाईट गस्तीदरम्यान गावठी कट्टे जप्त

इमेज
नंदुरबार जि. प्रतिनिधी :  नंदुरबार जिल्ह्यातील चिंचपाडा वनपरिक्षेत्रात वनविभागाने नाईट गस्तीदरम्यान कारवाई करत तीन संशयित इसमांकडून गावठी कट्टे, दारुगोळा व इतर साहित्य जप्त केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ९ मार्च २०२६ (सोमवार) रोजी चिंचपाडा येथील वनक्षेत्रपाल श्रीमती प्राशा पगार या आपल्या पथकासह नियतक्षेत्र चिंचपाडा कक्ष क्रमांक ८४ परिसरात रात्री गस्त घालत असताना तीन संशयित इसम आढळून आले.  त्यांची चौकशी व तपासणी केली असता त्यांच्या ताब्यातून दोन गावठी कट्टे (बंदुका), बंदुकीत वापरण्यात येणारा दारुगोळा, ससे तसेच एक मोटारसायकल जप्त करण्यात आली. यानंतर १० मार्च २०२६ रोजी संबंधित संशयितांविरुद्ध आवश्यक कागदपत्रे तयार करून त्यांना प्रथम वर्ग न्यायालय, नवापूर येथे हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना १३ मार्च २०२६ पर्यंत चार दिवसांची वनकोठडी सुनावली आहे. या प्रकरणी चिंचपाडा येथील वनरक्षकांनी गुन्हा नोंदवला असून वनपाल कामोद पुढील तपास करत आहेत. सदर कारवाई वनसंरक्षक निनू सोमराज (धुळे), उपवनसंरक्षक संतोष सस्ते (नंदुरबार), विभागीय वनाधिकारी दक्षता विभाग धुळे राजेंद्र सदगीर तसेच ...

लोकमत महाराष्ट्र ऑफ द इयर २०२६ : नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांना ‘आयएएस प्रॉमिसिंग’ पुरस्कार

इमेज
नंदुरबार ता प्रतिनिधी :  नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांना लोकमत  तर्फे देण्यात येणाऱ्या Lokmat Maharashtra of the Year Awards २०२६ मध्ये ‘आयएएस प्रॉमिसिंग’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा सन्मान एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. अत्यंत दुर्गम व आदिवासीबहुल असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात काम करताना त्यांनी प्रशासनाच्या कामाचा ठसा उमटवला आहे. विशेषतः ४० हजार आदिवासी बोलीभाषेतील वाक्यांचे संकलन करून त्यांना जागतिक स्तरावर पोहोचवण्याचा उपक्रम, तसेच अंगणवाडी आणि आरोग्य क्षेत्रात केलेले उत्कृष्ट कार्य यामुळे त्यांचे काम विशेष ठरले आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल डॉक्टर मिताली शेट्टी यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या जात आहेत. 

लोहगाव ता शिंदखेडा वानराला भावपूर्ण श्रद्धांजली ग्रामस्थांकडून अंत्ययात्रा..

इमेज
शिंदखेडा ता प्रतिनिधी :  शिंदखेडा तालुक्यातील लोहगाव येथे काही दिवसांपासून आजारी अवस्थेत गावात फिरत असलेल्या एका वानराचे ८ मार्च २०२६ रोजी निधन झाले. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात आली.यानंतर ९ मार्च २०२६ रोजी लोहगाव येथील ग्रामस्थांनी त्या वानराची अंत्ययात्रा काढून त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. पारंपरिक रितीरिवाजाप्रमाणे बँडच्या साथीने गावातून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत लोहगाव व परिसरातील ग्रामस्थ, युवक तसेच महिला भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. अंत्ययात्रेनंतर मिरवणूक काढत तापी नदीकिनारी त्या वानराचे अंत्यसंस्कार करण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमासाठी लोहगाव येथील युवक व ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच त्या वानराच्या स्मरणार्थ १८ मार्च २०२६ रोजी दशक्रिया विधी आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. या उपक्रमातून लोहगाव ग्रामस्थांनी प्राणिमात्रांप्रती असलेली संवेदना व जिव्हाळा पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे.

शिरपूर येथे युवा संघर्ष पार्टी महाराष्ट्र राज्य कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात.

इमेज
शिरपूर ता प्रतिनिधी : राज सोनवणे शिरपूर येथे युवा संघर्ष पार्टी महाराष्ट्र राज्य कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात. युवकांच्या व शेतकऱ्यांच्या  प्रश्नांवर आवाज उठवणारी आणि तरुणांना संघटित करण्याचे कार्य करणारी युवा संघर्ष पार्टीच्या महाराष्ट्र राज्य कार्यालयाचे उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला. या पक्षाचे मुख्य उद्दिष्ट युवकांना सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात संधी उपलब्ध करून देणे तसेच युवकांच्या हक्कांसाठी संघर्ष करणे हे आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन आपा साहेब शिरसाठ यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला युवा संघर्ष पार्टी महिला मोर्चाच्या धुळे जिल्हाध्यक्ष मंदा मालचे यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पाटील सर यांच्यासह हंसराज चौधरी, राकेश माली, कैलाश माली, महेश पाटील आणि जगदीश महाजन हे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान युवा संघर्ष पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजय भाऊ शिरसाठ (नवी दिल्ली) यांनी भूषविले. यावेळी उपस्थितांनी युवकांना संघटित करून समाजाच्या विकासासाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

कॉपर केबल चोरी करणारी टोळी गजाआड, निजामपुर पोलीसांची धडक कारवाई !

इमेज
प्रतिनिधी साक्री तालुका : निजामपूर : कॉपर केबल चोरी करणारी टोळी गजाआड, निजामपुर पोलीसांची धडक कारवाई निजामपुर पोलीस स्टेशन हद्दीतील फोफादे गावाचे शिवारात दिनांक ०७/०३/२०२६ रोजी पहाटे ०४.३० वाजेच्या दरम्यान सुझलॉन ग्लोबल सर्व्हिसेस प्रा.ली. कंपनीचे टॉवर क्रमांक जे-३१ मधील २४० स्केअर एम.एम.ची ३६० मीटर एकुण ३,६०,०००/- रुपये किंमतीची कॉपर कॅबल वायर चोरीस गेली त्यावरुन निजामपुर पोलीस स्टेशन येथे गुरनं ०५५/२०२६ बीएनएस कलम ३०५,३३१ (४), ३२४(४), ३ (५) प्रमाणे दि ०७/०३/२०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.  सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असल्याने सपोनि/मयुर भामरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे व प्रत्यक्षदर्शी साक्षींदारांना केलेल्या तपासावरुन नमुद गुन्हयातील आरोपी नामे १) फैजान रज्जाक खाटीक रा. जैताणे ता. साक्री, २) सुकदेव आनंदा कोळी रा. रजाळे ता. जि. नंदुरबार, ३) अल्तमश शौकत सय्यद रा. निजामपुर ता. साक्री, ४) दिपक पंडीत सोनवणे, ५) पावबा राजु मिल, ६) करण राजु मोरे तिन्ही रा. दुसाणे ता. साक्री जि. धुळे यांना ताब्यात घेवुन सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असुन त्यांना मा. न्यायालयाने पोली...

कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबार येथे डॉ. कैलाश मोते यांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक भाजीपाला नर्सरी तंत्रज्ञान प्रशिक्षण उत्साहात संपन्न

इमेज
नंदुरबार ता. प्रतिनिधी राम सोनवणे : कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबार येथे डॉ. कैलाश मोते यांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक भाजीपाला नर्सरी तंत्रज्ञान प्रशिक्षण उत्साहात संपन्न  संरक्षित शेती काळाची गरज_ मा.डॉ. कैलाश मोते, माजी संचालक फलोत्पादन, कृषि विभाग, महाराष्ट्र राज्य  शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन उत्पादनवाढ साध्य करण्याच्या उद्देशाने कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबार येथे दिनांक २५ ते २७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेले तीन दिवसीय प्रो-ट्रे भाजीपाला नर्सरी प्रशिक्षण उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडले. या प्रशिक्षणाला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.  समारोप प्रसंगी माजी संचालक, फलोत्पादन मा. डॉ. कैलाश मोते यांनी आपल्या मार्गदर्शनात भाजीपाला नर्सरी व्यवसायाचे वाढते महत्त्व अधोरेखित करत शेतकऱ्यांना आधुनिक नर्सरी तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी विशेष प्रोत्साहन दिले. त्यांनी गुणवत्तापूर्ण रोपे निर्मितीमुळे उत्पादनवाढ व अधिक आर्थिक लाभ मिळू शकतो, यावर भर दिला. तसेच फलोत्पादन क्षेत्रातील विविध शासकीय योजना, अनुदान योजना, संरक्...

विद्यावर्धिनी महाविद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

इमेज
धुळे ता. प्रतिनिधी : राज सोनवणे   धुळे  : विद्यावर्धिनी सभा संचलित डॉ. एम. वाय. वैद्य कला, प्रा. पी. डी. दलाल वाणिज्य व डॉ. डी. एस. शाह विज्ञान महाविद्यालय येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (रासेयो) विभागाच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जगदीश पाटील होते. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी समाजातील प्रत्येक व्यक्तीने “मातृहृदयी” व्हावे, स्त्रियांचा सन्मान राखावा आणि समाजात समानतेची भावना वाढीस लागावी, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. बाजीराव पाटील यांनी केले. त्यांनी महिला दिनाचे महत्त्व तसेच स्त्रियांच्या सक्षमीकरणाची आवश्यकता यावर प्रकाश टाकला. यावेळी रासेयो विभागाच्या वतीने महाविद्यालयातील महिला प्राध्यापक व विद्यार्थिनींचा सत्कार करून त्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. निलेश रोटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. राजीव आरके यांनी मानले. याप्रसंगी रास...