पोस्ट्स

ऑगस्ट, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे आर्वी येथील रोकडे हनुमान मंदिराच्या सर्विस रस्त्याचे अपूर्ण काम पूर्ण करण्याची मागणी

इमेज
धुळे | प्रतिनिधी :  धुळे तालुक्यातील आर्वी येथील मुंबई–आग्रा राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या श्री क्षेत्र रोकडे हनुमान मंदिर देवस्थान परिसरातील सर्विस रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण असल्याने भाविकांसह स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या सर्विस रस्त्याचे उर्वरित काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी रुबाब पिंजारी यांनी केली  या मागणीसंदर्भात २५ ऑगस्ट २०२६ रोजी मुंबईतील देवगिरी निवासस्थानी महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री मा. ना. सुनेत्रा ताई पवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले. यावेळी संबंधित प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन आवश्यक कार्यवाही करण्याची विनंती करण्यात आली. मुंबई–आग्रा राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या श्री क्षेत्र रोकडे हनुमान मंदिर देवस्थान येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र, मंदिर परिसरातील सर्विस रस्त्याचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याने भाविकांसह स्थानिक नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. विशेषतः ये-जा करताना नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यामु...

शिरपूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई! बुरखाधारी महिलांचा सराफा दुकानातील चोरीचा डाव उधळला; 9.10 लाखांचा मुद्देमाल जप्त

इमेज
  शिरपूर | प्रतिनिधी : शिरपूर शहरातील सराफा दुकानातून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या बुरखाधारी महिलांच्या टोळीचा शिरपूर शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी तीन महिला आणि एका पुरुषाला अटक करून त्यांच्या ताब्यातून एकूण 9 लाख 10 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सराफा दुकानातून 6 लाखांचे सोन्याचे दागिने चोरी दिनांक 5 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 2 ते रात्री 8 वाजेच्या दरम्यान महात्मा गांधी कॉम्प्लेक्स, शिरपूर येथील नंदूरबारकर सराफ दुकानातून तीन अनोळखी बुरखाधारी महिलांनी 40 ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील 8 जोड दागिने, अंदाजे 6 लाख रुपये किमतीचे, चोरी करून नेले होते. याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 339/2026, BNS कलम 305 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. CCTV आणि FASTagमुळे तपासाला मिळाली दिशा गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील CCTV फुटेज बारकाईने तपासले. त्यामध्ये आरोपी महिला एका स्विफ्ट डिझायर कारमधून जात असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी वाहनाचा क्रमांक मिळवून FASTagच्या माध्यमातून वाहनाच्या हालचालींची माहिती मिळवली. आरोपी मालेग...

धुळे जिल्ह्यात महिलांच्या सुरक्षेसाठी ‘दामिनी पथक’ कार्यान्वित

इमेज
धुळे | 14 ऑगस्ट 2026 : महिलांवरील अत्याचार, छेडछाड तसेच कौटुंबिक आणि सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या हिंसाचाराला आळा घालण्यासाठी धुळे जिल्हा पोलीस दलाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. 15 ऑगस्ट 2026 पासून धुळे शहर, शिरपूर शहर आणि साक्री पोलीस ठाणे येथे ‘दामिनी पथकां’ची स्थापना करण्यात येणार आहे. पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या संकल्पनेतून ही विशेष पथके कार्यान्वित करण्यात येत असून, महिला व बालकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात येणार आहे. या पथकांमध्ये महिला पोलीस अधिकारी व अंमलदारांचा समावेश राहणार असल्याने पीडित महिला आणि मुलींना आपल्या तक्रारी व अडचणी अधिक सहजपणे मांडता येणार आहेत. संवेदनशील ठिकाणी नियमित गस्त दामिनी पथकांकडून शाळा, महाविद्यालये, बसस्थानक, रेल्वे स्टेशन, बाजारपेठा, उद्याने तसेच निर्जन रस्त्यांवर नियमित गस्त घालण्यात येणार आहे. छेडछाड करणारे, टवाळखोर आणि असामाजिक घटकांवर पोलिसांचा धाक निर्माण करण्यासोबतच अनुचित घटना घडल्यास तातडीने मदत उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. जनजागृती आणि समुपदेशनावरही भर दामिनी पथकांकडून विद्यार्थिनी व महिलांना सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन केले जाणार ...

रंजाणे येथे दलित वस्तीचे नामकरण; ‘पंचशीलनगर’ नामफलकाचे अनावरण

इमेज
रंजाणे ता. शिंदखेडा, जि. धुळे | ८ ऑगस्ट २०२६ : रंजाणे गावातील दलित वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसराचे ‘पंचशीलनगर’ असे नामकरण करण्यात आले. यानिमित्ताने पंचशीलनगर नामफलकाचे उद्घाटन नगरसेवक तथा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटोळे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास महेंद्र भाऊसाहेब, जितेंद्बार ईशी बापू ठाकरे, आबा ईशी यांच्यासह गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. नामकरण सोहळ्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सागर बेसाणे (अध्यक्ष), प्रणय वैसाणे (उपाध्यक्ष), सुनील बैसाणे (खजिनदार) आणि आधार शिरसाठ (सदस्य) यांनी विशेष परिश्रम घेत कार्यक्रमाची संपूर्ण व्यवस्था केली. क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कार्यक्रमातून सामाजिक एकतेचा आणि समतेचा संदेश देण्यात आला. या ऐतिहासिक नामकरणामुळे रंजाणे गावातील या परिसराला आता ‘पंचशीलनगर’ अशी नवी ओळख मिळाली आहे.

रा. ति. काबरे विद्यालयात विद्यार्थ्यांना सायबर क्राईमविषयी मार्गदर्शन

इमेज
एरंडोल : रा. ति. काबरे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, एरंडोल येथे विद्यार्थ्यांना सायबर क्राईम तसेच सायबर सुरक्षेविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये सायबर गुन्ह्यांविषयी जागरूकता निर्माण करणे आणि डिजिटल माध्यमांचा सुरक्षितपणे वापर करण्याबाबत माहिती देणे हा होता. या मार्गदर्शन कार्यक्रमात बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विद्यार्थिनी कुमारी स्नेहल पाटील व कुमारी वैष्णवी पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी सोशल मीडिया वापरताना घ्यावयाची काळजी, अनोळखी लिंकवर क्लिक न करणे, वैयक्तिक माहिती व पासवर्ड सुरक्षित ठेवणे, ऑनलाइन फसवणूक टाळणे तसेच सायबर गुन्हा घडल्यास योग्य ती खबरदारी घेण्याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. विद्यार्थ्यांनीही या मार्गदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध प्रश्न विचारून सायबर सुरक्षेविषयी माहिती जाणून घेतली.विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सायबर गुन्ह्यांविषयी जागरूकता निर्माण होण्यास मोठी मदत झाली.   कार्यक्रम प्रसंगी शाळेचे मुख्...

आदिवासी युवा सेनेतर्फे ३३७ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

इमेज
शहादा, जि. नंदुरबार | १४ ऑगस्ट २०२६ : जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी युवा सेना महाराष्ट्रच्या वतीने फत्तेपूर, आमोदा व शिरूड येथील जिल्हा परिषद मराठी शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप व जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत फत्तेपूर येथील १८१, आमोदा येथील १३६ आणि शिरूड येथील २० अशा एकूण ३३७ विद्यार्थ्यांना वही, पेन व चॉकलेटचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, नियमित शाळेत उपस्थिती, पर्यावरण संरक्षण, व्यसनमुक्ती तसेच आदिवासी क्रांतिकारकांच्या गौरवशाली इतिहासाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करणे, सामाजिक व पर्यावरणीय मूल्यांबाबत जागरूकता वाढविणे आणि आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणा देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. यावेळी आदिवासी युवा सेनेचे सोशल मीडिया प्रमुख सुनिल पवार, वरिष्ठ सल्लागार सतिलाल दादा शेमळे, दिलीप दादा महिरे, दगडू निकुंभ, मुकेश पवार, भगीरथ ठाकरे, अनमोल पाडवी, राहुल मालचे, विठ्ठल मोरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच मुख्याध्यापक, शिक्षक, ग्रामप...

माणिकचंद नारायण काबरे विद्यालयात सायबर सुरक्षिततेबाबत जनजागृती

इमेज
सोनवद : डिजिटल युगात वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षिततेबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि क्विक हील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ६ ऑगस्ट २०२६ रोजी सोनवद येथील माणिकचंद नारायण काबरे विद्यालयात सायबर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना इंटरनेटचा सुरक्षित वापर, ऑनलाइन फसवणुकीपासून बचाव तसेच डिजिटल माध्यमांचा जबाबदारीने वापर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. स्नेहल पाटील व वैष्णवी पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत सायबर गुन्ह्यांचे प्रकार आणि त्यापासून बचाव करण्यासाठी आवश्यक खबरदारी याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी ओटीपी फ्रॉड, क्यूआर कोड फसवणूक, ऑनलाइन बँकिंग फ्रॉड, एआय व्हॉइस कॉल फ्रॉड, सोशल मीडिया फसवणूक, बनावट लिंक, फिशिंग, मजबूत पासवर्ड आणि टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) याबाबत विद्यार्थ्यांना सोप्या उदाहरणांसह माहिती देण्यात आली. अनोळखी व्यक्तींना ओटीपी, बँक खात्याची माहिती किंवा वैयक्तिक माहिती देऊ नये, संशयास्पद लिंकवर क्ल...

माणिकचंद नारायण काबरे विद्यालयात सायबर सुरक्षिततेबाबत जनजागृती

इमेज
जळगाव   : डिजिटल युगात वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षिततेबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि क्विक हील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ६ ऑगस्ट २०२६ रोजी सोनवद येथील माणिकचंद नारायण काबरे विद्यालयात सायबर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना इंटरनेटचा सुरक्षित वापर, ऑनलाइन फसवणुकीपासून बचाव तसेच डिजिटल माध्यमांचा जबाबदारीने वापर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. स्नेहल पाटील व वैष्णवी पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत सायबर गुन्ह्यांचे प्रकार आणि त्यापासून बचाव करण्यासाठी आवश्यक खबरदारी याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी ओटीपी फ्रॉड, क्यूआर कोड फसवणूक, ऑनलाइन बँकिंग फ्रॉड, एआय व्हॉइस कॉल फ्रॉड, सोशल मीडिया फसवणूक, बनावट लिंक, फिशिंग, मजबूत पासवर्ड आणि टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) याबाबत विद्यार्थ्यांना सोप्या उदाहरणांसह माहिती देण्यात आली. अनोळखी व्यक्तींना ओटीपी, बँक खात्याची माहिती किंवा वैयक्तिक माहिती देऊ नये, संशयास्पद...

महिला - पुरुषांच्या सहभागातून विकासाची नवी दिशा उन्नती केंद्र व शेतउन्नती महिला FPCची वार्षिक सभा

इमेज
धुळे : महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत कार्यरत उन्नती लोकसंचालित साधन केंद्र, धुळे तसेच शेतउन्नती महिला फार्म प्रोड्यूसिंग कंपनी यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा धुळे येथील कामगार भवन येथे उत्साहात संपन्न झाल्या. यावेळी वर्षभरातील कामकाजाचा आढावा घेण्यात आला. तसेच उत्कृष्ट काम करणाऱ्या महिला बचत गटांसह महिला सक्षमीकरणाला सहकार्य करणाऱ्या पुरुष सुधारकांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन भिरडाईचे सरपंच राजेंद्र आहेरराव यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महिला आर्थिक विकास महामंडळ मुख्यालयाचे स्मार्ट प्रकल्प अधिकारी रवींद्र सुरवसे, जिल्हा समन्वय अधिकारी जगन्नाथ वानखेडकर, जिल्हा महिला सक्षमीकरण अधिकारी तृप्ती पाटील, सखी वन स्टॉप सेंटरच्या विधी अधिकारी ॲड. गायत्री भामरे, प्रायमो कंपनीचे आरएमओ चंद्रकांत कोळी, सनियंत्रण अधिकारी मिलिंद पाटील, आयसीआयसीआयचे सेल्स मॅनेजर संदीप बच्छाव, उन्नती सीएमआरपी वर्षा पाटील, FPC अध्यक्षा उज्वला पाटील, सीएमआरसी सचिव भारती गुरव, FPC सचिव सुन...

सायबर सुरक्षा जनजागृतीविषयी इम्पॅक्ट सेशन व ॲक्टिव्हिटी संपन्न

इमेज
जळगाव : आशा वर्कर्स लेडीज, नवीपेठ, जळगाव येथे दि. ०८/०८/२०२६, शनिवार रोजी सकाळी १०.३० ते ११.३० वाजेपर्यंत सायबर सुरक्षा जनजागृती विषयावर विशेष इम्पॅक्ट सेशन व इम्पॅक्ट ॲक्टिव्हिटी आयोजित करण्यात आली होती. या सत्रामध्ये प्रियदर्शनी भांडारकर व खुशबू लांबोळे यांनी उपस्थितांना सायबर सुरक्षेबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली.यामध्ये ऑनलाइन फसवणूक, फिशिंग, विशिंग, स्मिशिंग, ओटीपी व पासवर्ड सुरक्षितता, मजबूत पासवर्ड तयार करण्याचे महत्त्व, द्विस्तरीय प्रमाणीकरण (2-Factor Authentication), सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, बनावट लिंक व क्यूआर कोड स्कॅमपासून सावध राहणे, सायबर बुलिंग, डिजिटल गोपनीयता, अज्ञात व्यक्तींशी ऑनलाइन संपर्क टाळणे, मोबाईल अॅप्स डाउनलोड करताना घ्यावयाची सुरक्षा काळजी तसेच सायबर गुन्ह्यांपासून बचाव करण्याच्या उपाययोजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. संवादात्मक व प्रभावी पद्धतीने घेण्यात आलेल्या या इम्पॅक्ट सेशन व ॲक्टिव्हिटीला उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सहभागी व्यक्तींनी विविध प्रश्न विचारून सायबर सुरक्षेबाबत माहिती जाणून घेतली. तसेच ऑनलाइन व्यवहार करताना सतर्क राहण्...

सायबर सुरक्षेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; सुरक्षित डिजिटल वापराचा दिला संदेश

इमेज
जळगाव : सरस्वती माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे इयत्ता ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा जनजागृतीविषयक मार्गदर्शन व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. शुक्रवार, दि. ७ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२ ते १ या वेळेत हे सत्र उत्साहात पार पडले. या वेळी प्रियदर्शनी भांडारकर व खुशबू लांबोळे यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. ऑनलाइन फसवणूक, फिशिंग, विशिंग, स्मिशिंग, ओटीपी व पासवर्ड सुरक्षितता, मजबूत पासवर्डचे महत्त्व तसेच द्विस्तरीय प्रमाणीकरण (2-Factor Authentication) याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. तसेच सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, बनावट लिंक व क्यूआर कोडच्या माध्यमातून होणारे स्कॅम, सायबर बुलिंग, डिजिटल गोपनीयता, अज्ञात व्यक्तींशी ऑनलाइन संपर्क टाळणे आणि मोबाईल अॅप्स डाउनलोड करताना घ्यावयाची काळजी याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी सतर्कता आणि जबाबदार डिजिटल वर्तन आवश्यक असल्याचा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला. संवादात्मक पद्धतीने झालेल्या या सत्रात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध प्रश्न विचारले. ऑनल...