सायबर सुरक्षेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; सुरक्षित डिजिटल वापराचा दिला संदेश


जळगाव : सरस्वती माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे इयत्ता ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा जनजागृतीविषयक मार्गदर्शन व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. शुक्रवार, दि. ७ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२ ते १ या वेळेत हे सत्र उत्साहात पार पडले.

या वेळी प्रियदर्शनी भांडारकर व खुशबू लांबोळे यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. ऑनलाइन फसवणूक, फिशिंग, विशिंग, स्मिशिंग, ओटीपी व पासवर्ड सुरक्षितता, मजबूत पासवर्डचे महत्त्व तसेच द्विस्तरीय प्रमाणीकरण (2-Factor Authentication) याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.


तसेच सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, बनावट लिंक व क्यूआर कोडच्या माध्यमातून होणारे स्कॅम, सायबर बुलिंग, डिजिटल गोपनीयता, अज्ञात व्यक्तींशी ऑनलाइन संपर्क टाळणे आणि मोबाईल अॅप्स डाउनलोड करताना घ्यावयाची काळजी याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी सतर्कता आणि जबाबदार डिजिटल वर्तन आवश्यक असल्याचा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला.

संवादात्मक पद्धतीने झालेल्या या सत्रात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध प्रश्न विचारले. ऑनलाइन व्यवहार करताना सावधगिरी बाळगण्यासह सुरक्षित डिजिटल जीवनशैलीचा अवलंब करण्याचा संकल्पही विद्यार्थ्यांनी केला.
या उपक्रमासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. दिपाली पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

टोकरतलाव ता.जि.नंदुरबार येथे महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन

शिरपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

अक्राणी तालुक्यात भ्रष्टाचाराच्या आरोपावरून ग्रामपंचायती विरोधात आमरण उपोषण