अक्कलकुवा पोलीस स्टेशन येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
नंदुरबार (प्रतिनिधी): आज दिनांक २९ नोव्शाहेंबर २०२५ रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सिव्हिल हॉस्पिटल यांच्या वतीने अक्कलकुवा पोलीस स्टेशन येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. DYSP सुभाष भोये सर यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक सारंग नवलकर सर यांच्या पुढाकाराने या शिबिराच यशस्वी आयोजन झाले. पोलीस अधिकारी व कर्मचारी असे एकूण 22 लोकांनी रक्तदान केले. सामाजिक बांधिलकीची भावना दाखवत , "सध्या रुग्णांना रक्ताची आवश्यकता भासत आहे. अशा परिस्थितीत, पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सामाजिक जबाबदारी म्हणून या शिबिरात सक्रिय सहभाग घेतला, हे अत्यंत कौतुकास्पद आहे." रक्तदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलची टीम उपस्थित होती. यामध्ये डॉ.विजय खजोटिया शांततालाल कोकणी (समुपदेशन), विश्वनाथ वळवी (समुपदेशन), शांताराम गावित (प्रयोगशाळा तंत्रज्ञ), प्रितम मेंथेवाड (प्रयोगशाळा तंत्रज्ञ), जगनण पावरा (प्रयोगशाळा तंत्रज्ञ), कांतीलाल वसावे (प्रयोगशाळा तंत्रज्ञ), दिलीप वसावे (परिचर), विकास वसावे (परिचर) आणि अभिषेक वळवी (वाहनचालक) यांचा समावेश होता. त्यांच्यासह पोलीस स्ट...