शिंदखेडा नगरपंचायत निवडणूक २०२५ उद्या मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत भव्य जाहीर सभा
शिंदखेडा ता. प्रतिनिधी - एस. आर. धिवरे
शिंदखेडा, दि. 26 नोव्हेंबर 2025 — शिंदखेडा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर उद्या, गुरुवार दि. 27 नोव्हेंबर 2025 रोजी शिंदखेडा शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मार्फत भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा सायंकाळी 4.30 वाजता गांधी चौक, शिंदखेडा येथे पार पडणार आहे.
या सभेला महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक, क्रीडा व युवक कल्याण मंत्री मा. ना. श्री. माणिकरावजी कोकाटे उपस्थित राहून मतदारांना मार्गदर्शन करणार आहेत. शिंदखेडा नगरपंचायतीच्या प्रचाराला वेग देण्यासाठी पक्षाच्या वतीने ही सभा आयोजित करण्यात आली असून, कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. नगराध्यक्षा पदासाठी अ. क्र. 3 – माळी कलावती सुकलाल या उमेदवाराच्या समर्थनार्थ व पार्टी कडून उभे असलेले सगळेच उमेदवारांसाठी ही सभा घेण्यात येत असून, पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
शहराच्या विकासाबाबत महत्त्वपूर्ण घोषणा आधीच देण्यात आल्या आहेत जसे रस्ते स्वच्छता आरोग्य शिक्षण सामाजिक सुविधा महिला सक्षमीकरण व सर्वसामान्यांच्या प्रश्नांचे सक्षम निराकरण हा मुख्य ध्यास घेऊन उमेदवार निवडणूकित उभे आहेत. उद्या मंत्री माणिकराव कोकाटे सभेत काय बोलतील व काय नवीन घोषणा करतील हे नक्कीच पाहण्यासारखे असणार आहे .स्थानिक पातळीवरही पक्षातील पदाधिकारी सभेची तयारी जोरदारपणे करीत आहेत.
शिंदखेडा नगरपंचायत सर्वत्रिक निवडणूकीत अनेक उमेदवार नगरसेवक व लोकनियुक्त नगराध्यक्षा पदासाठी अनेक उमेदवार उभे असून सगळे उमेदवार पूर्ण ताकद लावून निवडणूकित सामोरे जात आहेत या निवडणुकीत कोण बाजी मारते लवकरच जनतेला मतपेटीतून समजणार आहे
शिंदखेडा शहरातील नागरिकांनी या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा