अक्राणी तालुक्यात भ्रष्टाचाराच्या आरोपावरून ग्रामपंचायती विरोधात आमरण उपोषण


अक्राणी तालुका प्रतिनिधी :  
अक्राणी :- अक्राणी तालुक्यातील मोडलगाव ग्रामपंचायत तसेच इतर काही ग्रामपंचायतींमध्ये झालेल्या कथित भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी मोडलगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येणार आहे.


या संदर्भात संबंधित उपोषणकर्त्यांनी जिल्हा परिषद नंदुरबार, जिल्हाधिकारी नंदुरबार, जिल्हा पोलीस अधीक्षक नंदुरबार, गटविकास अधिकारी अक्राणी तसेच म्हसावद पोलीस ठाणे यांना निवेदन सादर केले आहे.



निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सदर ग्रामपंचायतींमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराबाबत वेळोवेळी लेखी तक्रारी व पत्रव्यवहार करूनही आजपर्यंत कोणतीही ठोस चौकशी करण्यात आलेली नाही. त्यामुळे नाईलाजाने आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याचे उपोषणकर्त्यांनी स्पष्ट केले आहे.

उपोषणकर्ते दिलवर पाडवी यांनी सांगितले की, संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी होईपर्यंत आणि दोषींवर कारवाई केली जात नाही, तोपर्यंत हे आमरण उपोषण मागे घेतले जाणार नाही, असा ठाम इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

टोकरतलाव ता.जि.नंदुरबार येथे महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन

शिरपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न