धुळे पोलिसांची मोठी कारवाई : 7.47 कोटींच्या अंमली पदार्थांचा नाश
धुळे, दि. 16 (प्रतिनिधी) – धुळे जिल्हा पोलीस दलाने अंमली पदार्थांविरोधात मोठी आणि ठोस कारवाई करत विविध गुन्ह्यांमधील जप्त अंमली पदार्थांचा कायदेशीर प्रक्रियेनुसार नाश केला. NDPS कायद्यांतर्गत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या एकूण 25 गुन्ह्यांमधील 3624.600 किलो वजनाचा व सुमारे 7 कोटी 47 लाख 16 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. या कारवाईत सुका गांजा (2109.710 किलो), गांजाची झाडे (1344.930 किलो) व अफूची बाँडे (119.960 किलो) यांचा समावेश होता. सर्वोच्च न्यायालय, केंद्र शासन व राज्य पोलीस महासंचालक कार्यालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही प्रक्रिया पार पाडण्यात आली.सदर कारवाई शिरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या मागील मोकळ्या जागेत करण्यात आली. यासाठी मोठा खड्डा करून त्यामध्ये जप्त अंमली पदार्थ टाकण्यात आले. त्यावर शेणखत, चुरी, सिंगल सुपर फॉस्फेट व ट्रायकोडर्मा यांचे मिश्रण टाकून कम्पोस्ट पद्धतीने नाश करण्यात आला. या वेळी जिल्हास्तरीय अंमली पदार्थ नाश समितीचे अध्यक्ष तथा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या अध्यक्षतेखाली कारवाई पार पडली. समितीचे सदस्य म्हणून राज्य उत्...