पोस्ट्स

जून, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शेतातून ९ हजार रुपयांची केबल वायर चोरी शिंदखेडा पोलिसांत गुन्हा दाखल

इमेज
शिंदखेडा प्रतिनिधी : शिंदखेडा तालुक्यातील चिरणे रोड परिसरातील एका शेतातून अज्ञात चोरट्याने ८० मीटर केबल वायर चोरी केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजयसिंग नथेसिंग राजपूत (वय ७४) यांचे चिरणे रोडवरील गट क्रमांक १८६ मध्ये शेत आहे. ३ जून रोजी सकाळी सुमारे ९ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने शेतातील ४० मीटर केबल वायर चोरी केली. त्यानंतर पुन्हा त्याच दिवशी आणखी ४० मीटर केबल वायर चोरून नेण्यात आली. या दोन्ही घटनांमध्ये प्रत्येकी ४ हजार ५०० रुपये किंमतीची केबल वायर चोरीस गेली असून, एकूण ९ हजार रुपये किंमतीची ८० मीटर केबल वायर लंपास करण्यात आली आहे. याप्रकरणी विजयसिंग राजपूत यांच्या फिर्यादीवरून शिंदखेडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

विश्व पर्यावरण दिनी बीपीसीएलचा हरित संकल्प नंदुरबारमध्ये १०० केशर आंबा रोपांचे वृक्षारोपण

इमेज
नंदुरबार, प्रतिनिधी : विश्व पर्यावरण दिनाच्या निमित्ताने भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल)च्या ५०.४० मेगावॅट पवन ऊर्जा प्रकल्प, नंदुरबार यांच्या वतीने डॉ. हेडगेवार सेवा समिती संचलित कृषि विज्ञान केंद्र, कोलदा येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमांतर्गत १०० केशर आंबा रोपांची लागवड करून पर्यावरण संवर्धन, जैवविविधता संरक्षण आणि शाश्वत विकासाचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाला सहयोगी अधिष्ठाता डॉ. होले , बीपीसीएलचे अधिकारी सुमीत कुमार व सतीश सिदार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. याशिवाय कृषि विज्ञान केंद्रातील सर्व शास्त्रज्ञ, तांत्रिक व सहाय्यक कर्मचारी तसेच बीपीसीएलचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वृक्षारोपणात सक्रिय सहभाग नोंदविला. यावेळी कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख राजेंद्र दहातोंडे यांनी बीपीसीएलच्या पर्यावरणपूरक उपक्रमाचे कौतुक केले. पर्यावरण संवर्धनासाठी शासन, उद्योग क्षेत्र आणि समाज यांचे संयुक्त प्रयत्न आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सहयोगी अधिष्ठाता डॉ. होले यांनी अशा उपक्रमांमुळे पर्यावरणाबाबत जनजागृती वाढून हरित भविष्यासाठी...