पोस्ट्स

सामाजिक लेबलसह पोस्ट दाखवत आहे

सुप्रीम कंपनी आणि 'यहा मोगी' संस्थेचा स्तुत्य सामाजिक उपक्रम महिला व विद्यार्थ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

इमेज
नंदुरबार  (विशेष प्रतिनिधी):  जळगाव येथील नामवंत सुप्रीम कंपनी आणि यहा मोगी संस्था धडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार तालुक्यातील अंबापूर गावात नुकताच एक भव्य सामाजिक कार्यक्रम पार पडला. या उपक्रमांतर्गत गावातील गरजू विधवा महिलांना आणि विद्यार्थ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच त्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन देखील  करण्यात आले. माजी बाल कल्याण समिती अध्यक्ष व  याहा  मोगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. विठ्ठल कदम यांच्या संकल्पनेतून हा मानवतावादी उपक्रम राबवण्यात आला. थंडीच्या दिवसांची गरज ओळखून आणि सामाजिक बांधिलकी जोपासत हे मदत कार्य करण्यात आले ज्याला सुप्रीम कंपनी जळगाव यांचे सहाय्य मिळाले. महिला आणि बालकांसाठी मदतीचा हात :  या कार्यक्रमात विधवा महिलांना गरम चादर, साडी, चप्पल आणि टिफिन डबे यांसारख्या दैनंदिन गरजेच्या वस्तूंची भेट देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लावण्यासाठी त्यांना स्टेशनरी, स्कूल बॅग आणि टिफिन देण्यात आले, तर लहान बालकांना थंडीपासून संरक्षणासाठी गरम कपडे आणि स्वेटर वाटप करण्यात आले. कायदे...