पोस्ट्स

जानेवारी, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अक्राणी तालुक्यात भ्रष्टाचाराच्या आरोपावरून ग्रामपंचायती विरोधात आमरण उपोषण

इमेज
अक्राणी तालुका प्रतिनिधी :   अक्राणी :- अक्राणी तालुक्यातील मोडलगाव ग्रामपंचायत तसेच इतर काही ग्रामपंचायतींमध्ये झालेल्या कथित भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी मोडलगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येणार आहे. या संदर्भात संबंधित उपोषणकर्त्यांनी जिल्हा परिषद नंदुरबार, जिल्हाधिकारी नंदुरबार, जिल्हा पोलीस अधीक्षक नंदुरबार, गटविकास अधिकारी अक्राणी तसेच म्हसावद पोलीस ठाणे यांना निवेदन सादर केले आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सदर ग्रामपंचायतींमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराबाबत वेळोवेळी लेखी तक्रारी व पत्रव्यवहार करूनही आजपर्यंत कोणतीही ठोस चौकशी करण्यात आलेली नाही. त्यामुळे नाईलाजाने आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याचे उपोषणकर्त्यांनी स्पष्ट केले आहे. उपोषणकर्ते दिलवर पाडवी यांनी सांगितले की, संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी होईपर्यंत आणि दोषींवर कारवाई केली जात नाही, तोपर्यंत हे आमरण उपोषण मागे घेतले जाणार नाही, असा ठाम इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे.

शिरपूर तालुक्यात आजपासून ‘भूमिपुत्र शेतकरी संघर्ष यात्रेला’ सुरुवात

इमेज
शिरपूर तालुक्यात आजपासून ‘भूमिपुत्र शेतकरी संघर्ष यात्रेला’ सुरुवात शिरपूर प्रतिनिधी ,शेतकरी व आदिवासी प्रश्नांसाठी विविध संघटनांचा संयुक्त एल्गार शिरपूर तालुक्यातील शेतकरी, आदिवासी व कष्टकरी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार पक्ष), भारतीय सामाजिक हक्क व न्याय अधिकार संघ, भारतीय समाज सेवा संघ तसेच एकलव्य आदिवासी क्रांतिकारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आजपासून ‘भूमिपुत्र शेतकरी संघर्ष यात्रा’ सुरू होत आहे. दि. 12 जानेवारी 2026 रोजी या संघर्ष यात्रेचा प्रारंभ होणार असून, दि. १ फेब्रुवारी 2026 रोजी शिरपूर तालुक्यातील पाचकंदील, शिरपूर (जि. धुळे) येथे भव्य समारोप होणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून शिरपूर तालुक्यातील शेतकरी व आदिवासी समाजाच्या ज्वलंत प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे. या संघर्ष यात्रेच्या प्रमुख मागण्यांमध्ये शिरपूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे सरसकट पंचनामे करून नुकसानभरपाई व कर्जमाफी द्यावी, रात्रपाळीची वीज बंद करून दिवसा वीजपुरवठा करावा, तसेच शेतमालाला हमीभाव मिळावा यांचा समावेश...

धुळे पोलिसांचा इशारा नायलॉन / चायनिज मांजाच्या विक्री-वापरावर कडक कारवाई व सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल होणार

इमेज
धुळे  प्रतिनिधी  आगामी मकर संक्रांती सणाच्या पार्श्वभूमीवर नायलॉन, चायनिज अथवा सिंथेटिक मांजाची अवैध विक्री, वाहतूक, साठवणूक व वापर करणाऱ्यांविरुद्ध अत्यंत कठोर कारवाई करण्यात येणार आहे. केवळ जप्तीपुरती मर्यादा न ठेवता, संबंधितांवर भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा (BNS कलम 110) गंभीर व अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा धुळे पोलिसांनी दिला आहे. पोलीस अधीक्षक धुळे, मा. श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना याबाबत स्पष्ट निर्देश दिले असून, नायलॉन अथवा चायनिज मांजा हा मानवी तसेच पशु-पक्ष्यांच्या जीवितास अत्यंत घातक असल्याने कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे नमूद करण्यात आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, नायलॉन मांजामुळे गळा चिरून मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटना यापूर्वी घडल्या आहेत. अशा परिस्थितीत, मांजाची विक्री करणाऱ्या विक्रेत्याला त्याचे घातक परिणाम माहिती असूनही नफ्यासाठी विक्री केल्यास तो गुन्हा सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाच्या व्याख्येत येतो. या गुन्ह्यासाठी १० वर्षांपर्यंत शिक्षा ...