उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे आर्वी येथील रोकडे हनुमान मंदिराच्या सर्विस रस्त्याचे अपूर्ण काम पूर्ण करण्याची मागणी
धुळे | प्रतिनिधी : धुळे तालुक्यातील आर्वी येथील मुंबई–आग्रा राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या श्री क्षेत्र रोकडे हनुमान मंदिर देवस्थान परिसरातील सर्विस रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण असल्याने भाविकांसह स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या सर्विस रस्त्याचे उर्वरित काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी रुबाब पिंजारी यांनी केली या मागणीसंदर्भात २५ ऑगस्ट २०२६ रोजी मुंबईतील देवगिरी निवासस्थानी महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री मा. ना. सुनेत्रा ताई पवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले. यावेळी संबंधित प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन आवश्यक कार्यवाही करण्याची विनंती करण्यात आली. मुंबई–आग्रा राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या श्री क्षेत्र रोकडे हनुमान मंदिर देवस्थान येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र, मंदिर परिसरातील सर्विस रस्त्याचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याने भाविकांसह स्थानिक नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. विशेषतः ये-जा करताना नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यामु...