रंजाणे येथे दलित वस्तीचे नामकरण; ‘पंचशीलनगर’ नामफलकाचे अनावरण
रंजाणे ता. शिंदखेडा, जि. धुळे | ८ ऑगस्ट २०२६ : रंजाणे गावातील दलित वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसराचे ‘पंचशीलनगर’ असे नामकरण करण्यात आले. यानिमित्ताने पंचशीलनगर नामफलकाचे उद्घाटन नगरसेवक तथा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटोळे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास महेंद्र भाऊसाहेब, जितेंद्बार ईशी बापू ठाकरे, आबा ईशी यांच्यासह गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. नामकरण सोहळ्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सागर बेसाणे (अध्यक्ष), प्रणय वैसाणे (उपाध्यक्ष), सुनील बैसाणे (खजिनदार) आणि आधार शिरसाठ (सदस्य) यांनी विशेष परिश्रम घेत कार्यक्रमाची संपूर्ण व्यवस्था केली.
क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कार्यक्रमातून सामाजिक एकतेचा आणि समतेचा संदेश देण्यात आला. या ऐतिहासिक नामकरणामुळे रंजाणे गावातील या परिसराला आता ‘पंचशीलनगर’ अशी नवी ओळख मिळाली आहे.
.jpeg)
.jpeg)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा