बलकुवे शिवजयंतीत जयाबाई दिलीप पाटील यांनी “लाडक्या बहिणी” योजनेतील ११,००० रु. शाळेला देण्याची घोषणा केली.

 शिरपूर  प्रतिनिधी 
 बलकुवे  ता. शिरपूर या गावात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमादरम्यान जयाबाई दिलीप पाटील यांनी त्यांना मिळणारे “लाडक्या बहिणी” योजनेतील 11,000 रु गावातील जिल्हा परिषद शाळेला देण्याचा निर्णय जाहीर केला. त्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे ग्रामस्थांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेश झाल्टे होते. त्यांचा सत्कार किशोर पाटील (उपसरपंच) यांनी केला. तसेच जयाबाई दिलीप पाटील यांचा सत्कार आशाबाई विनोद पाटील यांनी, तर दिलीप भाईदास पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. शरद पवार गट, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष) यांचा सत्कार सुभाष पाटील यांनी केला.


कार्यक्रमास आधार पाटील, राजेंद्र पाटील, राकेश पाटील, बापू रावण पाटील, ज्ञानेश्वर कोळी, अ‍ॅड. रोहित पाटोळे, सुनील शिरसाठ, राहुल पाटील, भुषण पाटील, राकेश माळी (शिरपूर) आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन अजय शिरसाठ यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

टोकरतलाव ता.जि.नंदुरबार येथे महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन

शिरपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

अक्राणी तालुक्यात भ्रष्टाचाराच्या आरोपावरून ग्रामपंचायती विरोधात आमरण उपोषण