विनोबा’ ॲप अंतर्गत जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय विजेत्या शिक्षकांचा सन्मान

नंदुरबार जि प्रतिनिधी: राम सोनवणे 
जिल्हा परिषद नंदुरबार व ओपन लिंक्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या ‘विनोबा’ ॲप उपक्रमांतर्गत उत्कृष्ट शैक्षणिक पोस्ट व नाविन्यपूर्ण उपक्रम सादर करणाऱ्या शिक्षकांचा जिल्हास्तरीय गौरव समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात ‘पोस्ट ऑफ द मंथ’ (POM) व ‘मॉर्निंग असेंब्ली’ (Morning Assembly) या उपक्रमांमध्ये जिल्हास्तरीय तसेच तालुकास्तरीय उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.


या प्रसंगी जिल्हा परिषद नंदुरबारचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. नमन गोयल (भा. प्र. से.) यांच्या हस्ते विजेत्या शिक्षकांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमास जिल्हा परिषद नंदुरबार उप मुख्य कार्यकारी अधिकारी  श्री. गणेश मोरे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मा. भानुदास रोकडे तसेच उपशिक्षणाधिकारी मा. डॉ. युनुस पठाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

‘पोस्ट ऑफ द मंथ’ जिल्हास्तरीय विजेते म्हणून सपना हिरे (जि.प. शाळा अंबापूर), शितल शिंदे (जि.प. शाळा बुधावल) आणि महेंद्र इशी (जि.प. शाळा विखरण) यांना जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात विनोबा ॲपवर उत्कृष्ट शैक्षणिक पोस्ट सादर केल्याबद्दल गौरविण्यात आले.


तसेच ‘मॉर्निंग असेंब्ली’ जिल्हास्तरीय विजेते म्हणून रंजना साबळे (जि.प. शाळा नांदरखे), मंदाकिनी वळवी (जि.प. शाळा टोकरतलाव) आणि अनुपमा वळवी (जि.प. शाळा टोकरतलाव) यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
याशिवाय तालुकास्तरीय ‘पोस्ट ऑफ द मंथ’ विजेते म्हणून गोविंद सूर्यवंशी (जि.प. शाळा खुशगव्हाण), जया नेरे (जि.प. शाळा लक्कडकोट), रणधीर भामरे (जि.प. शाळा दलेलपूर), सोनाली जिरे (जि.प. शाळा धिरजगाव), सीमा पाटील (जि.प. शाळा इंद्रहट्टी) आणि रागिनी वाडेकर (जि.प. शाळा देवसापाडा वरखेडी) यांचा प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.


विनोबा ॲपच्या माध्यमातून शिक्षकांनी केलेल्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांचे व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेल्या पुढाकाराचे यावेळी कौतुक करण्यात आले. जिल्हा परिषद शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता अधिक उंचावण्यासाठी शिक्षकांनी अशाच प्रकारे नवकल्पनांना चालना देत शैक्षणिक कार्य अधिक प्रभावीपणे राबवावे, असे आवाहन मान्यवरांनी केले.

या कार्यक्रमास ओपन लिंक्स फाउंडेशनचे प्रकल्प ऑफिसर विकास मोरे व आशिष गहाने यांचीही उपस्थिती होती.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

टोकरतलाव ता.जि.नंदुरबार येथे महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन

शिरपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

अक्राणी तालुक्यात भ्रष्टाचाराच्या आरोपावरून ग्रामपंचायती विरोधात आमरण उपोषण