पोस्ट्स

मे, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विकास लवांडे हल्ला प्रकरण संग्राम भंडारेच्या अटकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरपूर पोलिस ठाण्यावर आंदोलन

इमेज
धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने विकास लवांडे यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. यावेळी संग्राम भंडारे याला तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी करत शिरपूर तालुका पोलिस स्टेशन येथे पीआय परदेशी साहेबांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी “संग्राम भंडारे ला अटक करा”, “मनुवादी किड्याला अटक करा” तसेच “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो” अशा घोषणा दिल्या. निवेदन देताना धुळे जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे, एन. सी. आबा, गुलाबराव पाटील (शिरपूर तालुका निरीक्षक), व्यंकटेश पाटील (तालुका अध्यक्ष), प्रल्हाद पाटील (जिल्हा उपाध्यक्ष), राजेंद्र साहेबराव पाटील (जिल्हाध्यक्ष अपंग सेल), दिलीप भाईदास पाटील (विधानसभा क्षेत्र तालुका अध्यक्ष), प्रविण वाडिले (शहराध्यक्ष विधानसभा क्षेत्र), युवराज पावरा, संजु पावरा, मच्छिंद्र गुजर, नाना भिल यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते

धुळे पंचायत समितीतील तांत्रिक सहाय्यक लाच घेताना रंगेहात अटकेत

इमेज
धुळे ता. प्रतिनिधी  : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर विहिरीच्या अनुदानाची उर्वरित रक्कम मिळवून देण्यासाठी ७ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या पंचायत समिती धुळे येथील तांत्रिक सहाय्यकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. या प्रकरणातील आरोपी विश्वजित संजय भामरे (वय ३१), तांत्रिक सहाय्यक, पंचायत समिती धुळे यांनी तक्रारदाराकडे विहिरीच्या मोजमाप पुस्तिकेची तपासणी पुढे पाठविण्यासाठी शाखा अभियंता व उपअभियंत्यांच्या नावाने ७ हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रारदाराच्या वहिनीच्या नावे मौजे नंदाळे बु. येथे राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत विहीर मंजूर झाली असून त्यापैकी काही अनुदान प्राप्त झाले होते. उर्वरित अनुदान मिळविण्यासाठी तक्रारदार पाठपुरावा करत होते. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे येथे तक्रार दाखल केली होती. तक्रारीची पडताळणी पंचांसमक्ष करण्यात आली असता आरोपीने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सापळा कारवाईदरम्यान आरोपी विश्वजित भामरे यांनी तक्रारदाराकडून ७ हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना त्यांन...