विकास लवांडे हल्ला प्रकरण संग्राम भंडारेच्या अटकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरपूर पोलिस ठाण्यावर आंदोलन


धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने विकास लवांडे यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. यावेळी संग्राम भंडारे याला तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी करत शिरपूर तालुका पोलिस स्टेशन येथे पीआय परदेशी साहेबांना निवेदन देण्यात आले.


या प्रसंगी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी “संग्राम भंडारे ला अटक करा”, “मनुवादी किड्याला अटक करा” तसेच “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो” अशा घोषणा दिल्या.

निवेदन देताना धुळे जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे, एन. सी. आबा, गुलाबराव पाटील (शिरपूर तालुका निरीक्षक), व्यंकटेश पाटील (तालुका अध्यक्ष), प्रल्हाद पाटील (जिल्हा उपाध्यक्ष), राजेंद्र साहेबराव पाटील (जिल्हाध्यक्ष अपंग सेल), दिलीप भाईदास पाटील (विधानसभा क्षेत्र तालुका अध्यक्ष), प्रविण वाडिले (शहराध्यक्ष विधानसभा क्षेत्र), युवराज पावरा, संजु पावरा, मच्छिंद्र गुजर, नाना भिल यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

टोकरतलाव ता.जि.नंदुरबार येथे महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन

शिरपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

अक्राणी तालुक्यात भ्रष्टाचाराच्या आरोपावरून ग्रामपंचायती विरोधात आमरण उपोषण