धुळ्यात सरकारी नोकरीच्या नावाखाली ७८ लाखांचा महाघोटाळा; १३ जणांविरुद्ध गुन्हे दाखल
धुळे प्रतिनिधी : धुळे: सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांना लक्ष्य करून त्यांना बनावट नियुक्तीपत्रे देत लाखो रुपयांचा गंडा घालणारी एक मोठी टोळी धुळ्यात सक्रिय असल्याचे उघड झाले आहे. दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये तब्बल ७८ लाख ७४ हजार ५०० रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याप्रकरणी धुळे शहरातील दोन पोलीस ठाण्यांत एकूण १३ संशयितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिली घटना चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. अंबिका नगरमधील एका तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार, मे २०२३ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत संशयितांनी फिर्यादीचा भाऊ वेदांत आणि त्याच्या मित्रांना आरोग्य विभाग, आयकर विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. विश्वास संपादन करण्यासाठी संशयितांनी चक्क टपालाद्वारे बनावट नियुक्तीपत्रे पाठवली. या बदल्यात वेदांत मोराणकर यांच्याकडून ऑनलाइन ३९ लाख ७४ हजार ५०० आणि रोख २२ लाख असे एकूण ६१ लाख ७४ हजार ५०० रुपये उकळण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी ८ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये (३१८, ३३६, ३४० इ.) गुन्हा नोंदवला आहे. द...