उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे आर्वी येथील रोकडे हनुमान मंदिराच्या सर्विस रस्त्याचे अपूर्ण काम पूर्ण करण्याची मागणी
या मागणीसंदर्भात २५ ऑगस्ट २०२६ रोजी मुंबईतील देवगिरी निवासस्थानी महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री मा. ना. सुनेत्रा ताई पवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले. यावेळी संबंधित प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन आवश्यक कार्यवाही करण्याची विनंती करण्यात आली.
मुंबई–आग्रा राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या श्री क्षेत्र रोकडे हनुमान मंदिर देवस्थान येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र, मंदिर परिसरातील सर्विस रस्त्याचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याने भाविकांसह स्थानिक नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. विशेषतः ये-जा करताना नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यामुळे श्री क्षेत्र रोकडे हनुमान मंदिर देवस्थान परिसरातील सर्विस रस्त्याचे उर्वरित काम तातडीने पूर्ण करून भाविक व स्थानिक नागरिकांची गैरसोय दूर करण्यात यावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे करण्यात आली.
सदर प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित विभागामार्फत आवश्यक कार्यवाही करण्यात यावी, अशी अपेक्षा परिसरातील नागरिक व भाविकांनी व्यक्त केली आहे.
.jpeg)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा