आदिवासी युवा सेनेतर्फे ३३७ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
शहादा, जि. नंदुरबार | १४ ऑगस्ट २०२६ :
जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी युवा सेना महाराष्ट्रच्या वतीने फत्तेपूर, आमोदा व शिरूड येथील जिल्हा परिषद मराठी शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप व जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत फत्तेपूर येथील १८१, आमोदा येथील १३६ आणि शिरूड येथील २० अशा एकूण ३३७ विद्यार्थ्यांना वही, पेन व चॉकलेटचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, नियमित शाळेत उपस्थिती, पर्यावरण संरक्षण, व्यसनमुक्ती तसेच आदिवासी क्रांतिकारकांच्या गौरवशाली इतिहासाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करणे, सामाजिक व पर्यावरणीय मूल्यांबाबत जागरूकता वाढविणे आणि आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणा देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. यावेळी आदिवासी युवा सेनेचे सोशल मीडिया प्रमुख सुनिल पवार, वरिष्ठ सल्लागार सतिलाल दादा शेमळे, दिलीप दादा महिरे, दगडू निकुंभ, मुकेश पवार, भगीरथ ठाकरे, अनमोल पाडवी, राहुल मालचे, विठ्ठल मोरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच मुख्याध्यापक, शिक्षक, ग्रामपंचायत पदाधिकारी व पालकांनीही सहभाग घेतला.
फत्तेपूरच्या लोकनियुक्त सरपंच मोगराताई जितेंद्र पवार यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत या उपक्रमाचे कौतुक केले.
“आपला उपक्रम — आपल्या विद्यार्थ्यांसाठी, आपल्या समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी!” या भावनेतून आदिवासी युवा सेना महाराष्ट्रच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.
.jpeg)

.jpeg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा