विश्व पर्यावरण दिनी बीपीसीएलचा हरित संकल्प नंदुरबारमध्ये १०० केशर आंबा रोपांचे वृक्षारोपण
नंदुरबार, प्रतिनिधी : विश्व पर्यावरण दिनाच्या निमित्ताने भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल)च्या ५०.४० मेगावॅट पवन ऊर्जा प्रकल्प, नंदुरबार यांच्या वतीने डॉ. हेडगेवार सेवा समिती संचलित कृषि विज्ञान केंद्र, कोलदा येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमांतर्गत १०० केशर आंबा रोपांची लागवड करून पर्यावरण संवर्धन, जैवविविधता संरक्षण आणि शाश्वत विकासाचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाला सहयोगी अधिष्ठाता डॉ. होले, बीपीसीएलचे अधिकारी सुमीत कुमार व सतीश सिदार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. याशिवाय कृषि विज्ञान केंद्रातील सर्व शास्त्रज्ञ, तांत्रिक व सहाय्यक कर्मचारी तसेच बीपीसीएलचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वृक्षारोपणात सक्रिय सहभाग नोंदविला.
यावेळी कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख राजेंद्र दहातोंडे यांनी बीपीसीएलच्या पर्यावरणपूरक उपक्रमाचे कौतुक केले. पर्यावरण संवर्धनासाठी शासन, उद्योग क्षेत्र आणि समाज यांचे संयुक्त प्रयत्न आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सहयोगी अधिष्ठाता डॉ. होले यांनी अशा उपक्रमांमुळे पर्यावरणाबाबत जनजागृती वाढून हरित भविष्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण होत असल्याचे नमूद केले.
कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबार यांनी बीपीसीएलच्या या स्तुत्य उपक्रमाचे स्वागत करत भविष्यातही पर्यावरण संरक्षण व शाश्वत विकासासाठी अशा उपक्रमांना संपूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
“आज लावलेले प्रत्येक झाड हे उद्याच्या हरित, समृद्ध आणि शाश्वत भविष्याचे बीज आहे,” या संदेशासह साजरा करण्यात आलेला हा उपक्रम बीपीसीएलच्या पर्यावरण संरक्षण, सामाजिक बांधिलकी आणि शाश्वत विकासाप्रती असलेल्या दृढ वचनबद्धतेचे प्रतीक ठरला.



.jpeg)
.jpeg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा