तळोदा निवडणूक जिंकल्यास मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विजय सोहळा साजरा करण्यासाठी येणार तळोदा शहरात.
विशेष प्रतिनिधी तळोदा
तळोदा – दिनांक २७ /११/ २०२५ रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तळोद्यात जाहीर सभा आयोजित केली होती . नगरविकास विभागाच्या विविध योजनांमुळे शहरांच्या प्रगतीला नवे बळ मिळत असून, या योजनांचा व्यापक फायदा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचत आहे. महिलांच्या सबलीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या विशेष उपक्रमांमुळे येणाऱ्या काळात शहरांचा विकास अधिक वेगाने होणार असल्याचे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तळोद्यात व्यक्त केले.

तळोद्यात आयोजित जाहीर सभेत बोलताना शिंदे म्हणाले की, “लाडकी बहिण योजना” या माध्यमातून लाखो महिलांना आर्थिक दिलासा मिळत आहे. योजनेबाबत अफवा पसरवून विरोधक दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असले तरीही ही योजना बंद होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सभेला आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार आशा पाडवी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती लाभली. ग्रामीण व शहरी भागातील महिलांसाठी बचत गट निर्माण करून त्यांना नगरविकास मंत्रालयाकडून शाश्वत निधी उपलब्ध करून देण्याच्या योजना सरकारद्वारे राबवल्या जात असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान, तळोदा नगरपालिका निवडणुकीत विजयानंतर ३ डिसेंबर रोजी भव्य विजय सोहळा साजरा केला जाणार असल्याची माहिती सभेत दिली . कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून विजय सोहळ्याच्या तयारीला वेग आला आहे. संपूर्ण तालुक्यात याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
तळोदा नगरपालिकेतील शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार हितेंद्र सरवनसिंह क्षत्रिय आणि अन्य २१ उमेदवार तसेच नंदुरबार नगर परिषदेतील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रत्ना रघुवंशी आणि ४१ उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन याप्रसंगी केले. 3 डिसेंबरला लवकरच जनतेला समजणार आहे की तळोदा शहरात आणि नंदुरबार शहरात कोण बाजी मारत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा