शिंदखेडा येथे तालुकास्तरीय शेतकरी अवेअरनेस मीटिंग उत्साहात पार १५८ शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग


शिंदखेडा येथे तालुकास्तरीय शेतकरी अवेअरनेस मीटिंग उत्साहात पार १५८ शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
शिंदखेडा ता. प्रतिनिधी - एस. आर. धिवरे 
पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून आणि कृषी विभागाच्या योग्य समन्वयामुळे शिंदखेडा शहरातील ओम साई मंगल कार्यालयात आज तालुकास्तरीय शेतकरी अवेअरनेस मीटिंग उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. शेतकरी शिक्षण, कृषी तंत्रज्ञान आणि सरकारी योजनांची माहिती देण्यासाठी आयोजित या बैठकीत तालुक्यातील विविध भागांतून मोठ्या संख्येने शेतकऱ्यांची उपस्थिती लाभली. या बैठकीत एकूण १५८ शेतकरी, १५ हून अधिक कृषी अधिकारी, तसेच १०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांची नोंदणी झाली. पाणी फाउंडेशनच्या टीमने शेतीसंदर्भातील विविध विषयांवर उपयुक्त मार्गदर्शन केले. यावेळी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान, पीक व्यवस्थापन आणि उपलब्ध शासकीय योजनांविषयी उत्साहाने प्रश्न विचारत सक्रिय सहभाग नोंदवला.


कृषी विभागाच्या योजनांची सविस्तर माहिती

कार्यक्रमात खालील मुद्द्यांवर मार्गदर्शन केले :

  • विविध कृषी योजनांचा लाभ कसा मिळवावा
  • तांत्रिक सल्ला, आधुनिक शेती पद्धती आणि नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन
  • पीकपद्धती, माती परीक्षण आणि पाणी व्यवस्थापन
  • शेतकऱ्यांच्या समस्या व शंका निरसन

पाणी फाउंडेशनच्या टीमनेही विषयानुरूप प्रस्तुतीकरणांद्वारे शेतकऱ्यांना व्यावहारिक व उपयुक्त मार्गदर्शन केले.


मान्यवरांची उपस्थित बैठकीसाठी कृषी विभागातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते:

  • उपविभागीय कृषी अधिकारी – मनोज सिसोदे सर
  • तालुका कृषी अधिकारी – देवेंद्र नागरे सर
  • मंडळ कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी व अन्य संपूर्ण कृषी विभाग टीम

त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रम अधिक प्रभावी व माहितीपूर्ण ठरला.सन्मान व आभार प्रदर्शन

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित शेतकरी व  उपस्थितांकडून संपूर्ण कृषी विभाग टीमचा "तीन टाळ्या – तीन फुले" देऊन सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला. उपस्थितांनी कार्यक्रमाचे नियोजन, समन्वय आणि माहितीपूर्ण सत्रांचे कौतुक केले.

कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न

अवेअरनेस मीटिंग कोणत्याही अडचणीशिवाय यशस्वीरीत्या पार पडली. शेतकऱ्यांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत करत अशा प्रशिक्षण कार्यक्रमांमुळे आधुनिक शेतीविषयी माहिती, तंत्रज्ञान आणि योजनांचा प्रभावी लाभ मिळतो, असे समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमाला टीम पाणी – धुळे–नंदुरबार यांची विशेष उपस्थिती लाभली.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

टोकरतलाव ता.जि.नंदुरबार येथे महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन

शिरपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

अक्राणी तालुक्यात भ्रष्टाचाराच्या आरोपावरून ग्रामपंचायती विरोधात आमरण उपोषण