शिंदखेडा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भव्य प्रचार सभा उत्साहात संपन्न

शिंदखेडा ता. प्रतिनिधी एस. आर. धिवरे 
नगरपंचायतीतील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत नगराध्यक्ष व सर्व प्रभागांतील नगरसेवक पदांसाठी भव्य प्रचार सभेचे आयोजन काल मोठ्या उत्साहात करण्यात आले. शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून या सभेला अपूर्व प्रतिसाद दिला.

सभेला उपस्थित राहून मार्गदर्शन करणाऱ्या मान्यवरांमध्ये आमदार व पक्षाच्या प्रवक्त्या सना ताई मलिक, प्रदेश सरचिटणीस सूरज जी चव्हाण, जिल्हाध्यक्ष सुरेश अण्णा सोनवणे, प्रवक्ते शाम जी सानेर, माजी आमदार रामकृष्ण जी पाटील, इद्रीस जी कुरेशी, जोसेफ जी मलबारी, सुमित जी पवार, सलीम जी मिस्त्री, सुभाष माळी, प्रकाश चौधरी, उमाकांत देसले, दीपक जगताप, गोलू देसले, दिलीप भामरे, नीलेश पाटील, रविंद्र मालचे, राहुल पाटील, अर्जुन भील, भगवान मराठे आदी मान्यवरांचा मोठ्या उत्साहात सहभाग होता.


नेतृत्वाचे मार्गदर्शन, जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि कार्यकर्त्यांची अखंड एकता यामुळे सभा अत्यंत यशस्वी झाली. विविध मान्यवरांनी शिंदखेडा नगरपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी स्पष्ट दिशा व धोरणे मांडली. शहरातील प्रत्येक घटकापर्यंत विकास पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार माळी कलाताई सुकलाल कलाताईंच्या उमेदवारीची घोषणा होताच महिलांत तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये उत्सुकता व विश्वासाचे वातावरण निर्माण झाले. शिंदखेड्याच्या स्थिरता, पारदर्शी प्रशासन व सर्वांगीण विकासासाठी त्यांनी कटिबद्धतेची ग्वाही दिली.


🕰️ “या वेळी घड्याळावर विश्वास, घड्याळावर मतदान”

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिंदखेड्यासाठी नवीन दिशा, स्थिर नेतृत्व व न्याय्य विकासाची हमी देत नागरिकांना घड्याळ चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन केले. सभेतील ऊर्जावान वातावरण आणि नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद पाहता, शिंदखेड्यातील निवडणूक वातावरण अधिकच तापण्याची चिन्हे दिसत.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

टोकरतलाव ता.जि.नंदुरबार येथे महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन

शिरपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

अक्राणी तालुक्यात भ्रष्टाचाराच्या आरोपावरून ग्रामपंचायती विरोधात आमरण उपोषण