वेल्हाणे गावात सविधान दिन कबीरा फाउंडेशनच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला.
धुळे ता विशेष प्रतिनिधी :
वेल्हाणे गावात सविधान दिन कबीरा फाउंडेशनच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला. संविधान दिन आणि त्याचे महत्त्व तसेच भारतीयांच्या जीवनामध्ये संविधानाने घडवून आणलेला अमुलाग्र बदल लोकांपर्यंत पोहोचावा आणि त्या माध्यमातून संविधान जागृती सतत होत राहील यासाठी कबीरा फाउंडेशन संविधानिक नैतिकता समाजामध्ये रुजवण्यासाठी काम करते. वेल्हाणे तालुका जिल्हा धुळे येथे संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. समाज कार्यकर्ता विश्वजीत वाघ भारतीय संविधानाची पार्श्वभूमी तसेच मतदानाचा अधिकार आणि इतर अनेक गोष्टींवर प्रकाश टाकत, पण सर्व भारतीयांनी बाबासाहेबांचे भारतीय राज्यघटनासाठी नेहमी ऋणी राहिले पाहिजे असे मत व्यक्त केले.
समाज कार्यकर्ता अनिल बागुल यांनी बाबासाहेबांच्या चरित्र वाचून त्याच्या स्वतःच्या जीवनामध्ये झालेला बदल आणि त्या बदलातून निर्माण झालेले वाचनाची आवड तसेच बाबासाहेबांच्या जीवनावर लिहिलेलं स्वलिखित गीत या कार्यक्रमादरम्यान सादर केले.
आज देशाची परिस्थिती बघता, लोकांनी संविधान साक्षर होणे काळाची गरज आहे. आम्ही भारताचे लोक ही भावना आणि भूमिका लोकांमध्ये रुजणं फार आवश्यक आहे. संविधानाने या देशांमध्ये लोकशाही निर्माण केली, लोकांच्या हातामध्ये सर्व सूत्र दिले. लोकप्रतिनिधी ,लोकसेवक आणि भारतीय जनता यामध्ये भारतीय जनता खऱ्या अर्थाने या देशाची चालक आणि मालक आहे हे भावना लोकांमध्ये सातत्याने रुजवावी लागेल. लोकप्रतिनिधी हे लोकांकडून पाच वर्षासाठी निवडून दिले जातात, पुढील पाच वर्षासाठी त्यांना लोकांचे कामे करावे लागतात, जर लोकांचे काम केले नाहीत तर लोक त्यांना सत्तेपासून दूर करू शकतात. सर्व सरकारी नोकर हे या देशाच्या जनतेच्या सेवा करण्यासाठी निर्माण केलेली व्यवस्था आहे हे लोकांना समजण् काळाची गरज आहे. आपण लोक आहोत, आणि सरकारी नोकर "लोकसेवक". लोकसेवक जनतेच्या सेवेसाठी आहेत, ते जनतेचे मालक नाहीत. स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळवून देणारे भारतीय संविधानाच्या जगातला पहिला संविधान ठरला आहे. अस्पृश्यताबंदी, कायद्यापुढे समानता, न्यायालयीन पुनर्विलोकन, कायद्याचे राज्य हे संविधानाचे मूळ संकल्पना आहे. या देशातल्या प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार संविधानाने बहाल केला आहे म्हणून प्रत्येकाने संविधान समजून घेतले पाहिजे असे मत या कार्यक्रमातून व्यक्त झाले.
कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती अनुलोम संस्थेचे स्वप्निल पाटील, समाज कार्यकर्त्या रंजना पवार उपस्थित होते. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने लहान बालके आणि महिला पुरुष उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी साहेबराव वाघ, मधुकर वाघ, विश्वजीत वाघ अनिल बागुल यांनी परिश्रम घेतले.

.jpeg)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा