धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात सहाय्यक आयुक्त समाज कल्याण धुळे यांच्या वतीने संविधान अमृत महोत्सव व “घर-घर संविधान” उपक्रमाचा शुभारंभ
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात २६ नोव्हेंबर दुपारी चार वाजता संविधान अमृत महोत्सव तसेच “घर-घर संविधान” या महत्त्वपूर्ण जनजागृती उपक्रमाचा औपचारिक शुभारंभ उत्साहात पार पडला. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग धुळे यांच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम सामाजिक न्याय आणि संविधानिक मूल्ये जनमानसात दृढ करण्याच्या उद्देशाने घेण्यात आला.
या प्रसंगी प्रमुख उपस्थित म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी मा. श्री. संजय बागडे यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. तसेच अॅड. राहुल वाघ यांनी संविधानातील मूलभूत अधिकार, कर्तव्ये आणि सर्वसामान्य नागरिकांवर येणाऱ्या जबाबदाऱ्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी संविधानाचा दैनंदिन जीवनाशी असलेला संबंध स्पष्ट करत समाजात संवैधानिक मूल्यांची जाणीव वाढविण्याची गरज अधोरेखित केली.
कार्यक्रमात सामाजिक न्याय विभागांतर्गत विविध महामंडळांचे अधिकारी, कर्मचारी, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती धुळे येथील अधिकारी कर्मचारी, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक, बहुजन कल्याण अधिकारी, तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त विविध पुरस्कारधारकांचाही कार्यक्रमात सन्मानपूर्वक उपस्थिती होती. संविधान दिवसाचे औचित्य साधत समाजात समानता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचे संवर्धन करण्याचा संकल्प सर्वांनी व्यक्त केला.
.jpeg)
.jpeg)
.jpeg)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा