शिरपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

प्रतिनिधी - राज सोनवणे , शिरपूर ता. 
शिरपूर, 24 नोव्हेंबर 2025 — राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची आज शिरपूर येथे  पक्ष कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. तालुक्यातील प्रमुख  पदाधिकारी कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने या बैठकीत उपस्थित होते.

बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात विस्तृत चर्चा करण्यात आली. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्यात आली.आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) जोरदार तयारीने उतरून प्रत्येक गण व गटावर उमेदवार उभे करणार असल्याचा ठाम नारा बैठकीत देण्यात आला.

पक्षाकडून शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, मागासवर्गीय  व वंचित घटकांच्या सर्वांंगीण विकासाची जबाबदारी घेत असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तालुक्याचा एकूण विकास आणि संघटन बळकटीसाठी विविध दिशानिर्देशही देण्यात आले. पुढील 8 ते 10 दिवसांत अंतिम बैठक घेऊन सर्व गण व गटातील उमेदवार निश्चित केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

बैठकीत अ‍ॅड. रोहित पाटोळे आणि दिलीप भाईदास पाटील (विधानसभा क्षेत्राध्यक्ष ) यांनी पक्ष वाढ संघटन बांधणी  कार्यकर्त्यांची एकजूट आणि निवडणूक व्यवस्थापना बाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. त्यांनी संपूर्ण तालुक्यात पक्षाची मजबूत पकड निर्माण करण्याचा आत्मविश्वास व्यक्त केला. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक कशाप्रकारे जिंकू शकतो याबाबतीत आराखडा व जबाबदाऱ्या सगळ्यांना  देण्यात आल्या.

या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)  पक्षाचे तालुका अध्यक्ष  व्यंकट पाटील  दिलीप भाईदास पाटील ( विधानसभा क्षेत्र अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष ) अ‍ॅड. रोहित पाटोळे, बाळासाहेब पाटील, धरमसिंग पावरा ( ता.सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष व आदिवासी सेल तालुकाध्यक्ष ) राजेंद्र पाटील आणि तालुक्यातील सर्व इच्छुक उमेदवार उपस्थित होते.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

टोकरतलाव ता.जि.नंदुरबार येथे महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन

अक्राणी तालुक्यात भ्रष्टाचाराच्या आरोपावरून ग्रामपंचायती विरोधात आमरण उपोषण