इकोनेट संस्थेच्या माध्यमातून दुधाडे तालुका जिल्हा नंदुरबार येथे संविधान दिन साजरा करण्यात आला.
नंदुरबार ता. विशेष प्रतिनिधी :
इकोनेट संस्थेच्या माध्यमातून दुधाडे तालुका जिल्हा नंदुरबार येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. इकोनेट संस्थेच्या माध्यमातून नंदुरबार जिल्ह्यामध्ये संविधान जाणीव जागृती करण्याचे काम सुरू आहे. त्या अनुषंगाने दिनाक 26.11.2025 रोजी दुधाडे येथील अंगणवाडी केंद्रात कार्यक्रम संपन्न झाला.
नंदुरबारच्या इकोनेट संस्थेच्या फेलो प्रतीक्षा वाघ यांनी अंगणवाडी सेविका सुजाता पवार यांच्या मदतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
संविधान दिनानिमित्त इकोनेट संविधान फेलो प्रतीक्षा वाघ यांनी, भारतीय संविधान आणि महिला या विषयावर महिलांना माहिती दिली. भारतीय संविधान निर्माण करण्यामध्ये 15 महिलांचा देखील सहभाग होता, भारतीय संविधानामुळे भारतीय महिलांचा खऱ्या अर्थाने पुनर्जन्म झाला आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून लिंग आधारित भेद नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि त्या अनुषंगाने भारतीय संविधान कलम 15 मध्ये तरतूद केली की धर्म जात लिंग आणि जन्मस्थान यावरून भेदभाव केला जाणार नाही. लिंगाच्या आधारावर होणारा भेदभाव संविधानाने नाकारला. महिलांना देखील मतदानाचा अधिकार दिला. महिलांना शिक्षणाचा अधिकार दिला. महिलांना नोकरी करण्याचा अधिकार दिला. प्रसुती रजा, प्रसूती सहाय्य, कामाचा अधिकार, समानतेचा अधिकार, शोषणाविरुद्धचा अधिकार इत्यादी अधिकार देण्यात आला.
प्रतिक्षा वाघ यांनी भारतीय संविधानाचे प्रास्ताविकेतील प्रत्येक शब्दाचे महत्त्व उपस्थित महिला वर्गाला समजावून सांगितलं. संविधानाच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेले महिलांचा संरक्षणासाठी असलेले कायदे याची देखील थोडक्यात माहिती त्यांनी दिली.
सदर कार्यक्रमासाठी 14 महिला आणि बालके उपस्थित होते.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुचीता पवार, भारती समुद्रे, पुष्पा पवार , रश्मी भील यांनी परिश्रम घेतले.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा