विद्यावर्धिनी महाविद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा


धुळे ता. प्रतिनिधी : राज सोनवणे  
धुळे : विद्यावर्धिनी सभा संचलित डॉ. एम. वाय. वैद्य कला, प्रा. पी. डी. दलाल वाणिज्य व डॉ. डी. एस. शाह विज्ञान महाविद्यालय येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (रासेयो) विभागाच्या वतीने करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जगदीश पाटील होते. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी समाजातील प्रत्येक व्यक्तीने “मातृहृदयी” व्हावे, स्त्रियांचा सन्मान राखावा आणि समाजात समानतेची भावना वाढीस लागावी, असे आवाहन केले.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. बाजीराव पाटील यांनी केले. त्यांनी महिला दिनाचे महत्त्व तसेच स्त्रियांच्या सक्षमीकरणाची आवश्यकता यावर प्रकाश टाकला.

यावेळी रासेयो विभागाच्या वतीने महाविद्यालयातील महिला प्राध्यापक व विद्यार्थिनींचा सत्कार करून त्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. निलेश रोटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. राजीव आरके यांनी मानले.


याप्रसंगी रासेयो विभागीय समन्वयक डॉ. संतोष खत्री, डॉ. मंजू तरडेजा यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि रासेयो स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

टोकरतलाव ता.जि.नंदुरबार येथे महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन

शिरपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

अक्राणी तालुक्यात भ्रष्टाचाराच्या आरोपावरून ग्रामपंचायती विरोधात आमरण उपोषण