लोकमत महाराष्ट्र ऑफ द इयर २०२६ : नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांना ‘आयएएस प्रॉमिसिंग’ पुरस्कार
नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांना लोकमत तर्फे देण्यात येणाऱ्या Lokmat Maharashtra of the Year Awards २०२६ मध्ये ‘आयएएस प्रॉमिसिंग’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा सन्मान एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
अत्यंत दुर्गम व आदिवासीबहुल असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात काम करताना त्यांनी प्रशासनाच्या कामाचा ठसा उमटवला आहे. विशेषतः ४० हजार आदिवासी बोलीभाषेतील वाक्यांचे संकलन करून त्यांना जागतिक स्तरावर पोहोचवण्याचा उपक्रम, तसेच अंगणवाडी आणि आरोग्य क्षेत्रात केलेले उत्कृष्ट कार्य यामुळे त्यांचे काम विशेष ठरले आहे.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल डॉक्टर मिताली शेट्टी यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या जात आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा