लोहगाव ता शिंदखेडा वानराला भावपूर्ण श्रद्धांजली ग्रामस्थांकडून अंत्ययात्रा..
शिंदखेडा तालुक्यातील लोहगाव येथे काही दिवसांपासून आजारी अवस्थेत गावात फिरत असलेल्या एका वानराचे ८ मार्च २०२६ रोजी निधन झाले. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात आली.यानंतर ९ मार्च २०२६ रोजी लोहगाव येथील ग्रामस्थांनी त्या वानराची अंत्ययात्रा काढून त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. पारंपरिक रितीरिवाजाप्रमाणे बँडच्या साथीने गावातून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत लोहगाव व परिसरातील ग्रामस्थ, युवक तसेच महिला भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या.
अंत्ययात्रेनंतर मिरवणूक काढत तापी नदीकिनारी त्या वानराचे अंत्यसंस्कार करण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमासाठी लोहगाव येथील युवक व ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच त्या वानराच्या स्मरणार्थ १८ मार्च २०२६ रोजी दशक्रिया विधी आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. या उपक्रमातून लोहगाव ग्रामस्थांनी प्राणिमात्रांप्रती असलेली संवेदना व जिव्हाळा पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे.
.jpeg)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा