वेल्हाणे माध्यमिक विद्यालय 2009 बॅचचा माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन उत्साहात
धुळे जि. प्रतिनिधी : राज सोनवणे
माध्यमिक विद्यालय, वेल्हाणे ता. जि. धुळे येथे सन 2009 मध्ये दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा माजी विद्यार्थ्यांचा सस्नेह मेळावा मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडला. अनेक वर्षांनंतर एकमेकांना भेटण्याची संधी मिळाल्याने माजी विद्यार्थ्यांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
या मेळाव्यास तत्कालीन मुख्याध्यापक श्री. व्ही. एस. सोनवणे तसेच शिक्षकवृंद श्री. आर. एस. सोनवणे, श्रीमती पी. एन. पाटील, श्री. ए. एस. पाटील, श्री. एल. डी. पाटील, श्री. एम. डी. अहिरे आणि श्री. निवृत्ती मराठे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उपस्थित शिक्षकांचा माजी विद्यार्थ्यांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील अनेक आठवणींना उजाळा दिला. बालपणातील शिक्षण, वर्गातील खोड्या, मित्रांमधील भांडणं, मस्करी, खेळ आणि त्या काळातील अविस्मरणीय क्षण यांची मनमोकळेपणाने आठवण काढण्यात आली. अनेक वर्षांनंतर पुन्हा एकत्र आल्याने जुन्या मैत्रीचे बंध अधिक दृढ झाल्याचे भावनिक चित्र या मेळाव्यात पाहायला मिळाले.
यावेळी शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जीवनात शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले तसेच विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल आनंद व्यक्त केला. शेवटी सर्व माजी विद्यार्थ्यांनी अशा प्रकारचे स्नेहसंमेलन पुढेही आयोजित करण्याचा निर्धार व्यक्त केला.



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा