नंदुरबार : चिंचपाडा वनपरिक्षेत्रात नाईट गस्तीदरम्यान गावठी कट्टे जप्त
नंदुरबार जिल्ह्यातील चिंचपाडा वनपरिक्षेत्रात वनविभागाने नाईट गस्तीदरम्यान कारवाई करत तीन संशयित इसमांकडून गावठी कट्टे, दारुगोळा व इतर साहित्य जप्त केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ९ मार्च २०२६ (सोमवार) रोजी चिंचपाडा येथील वनक्षेत्रपाल श्रीमती प्राशा पगार या आपल्या पथकासह नियतक्षेत्र चिंचपाडा कक्ष क्रमांक ८४ परिसरात रात्री गस्त घालत असताना तीन संशयित इसम आढळून आले.
त्यांची चौकशी व तपासणी केली असता त्यांच्या ताब्यातून दोन गावठी कट्टे (बंदुका), बंदुकीत वापरण्यात येणारा दारुगोळा, ससे तसेच एक मोटारसायकल जप्त करण्यात आली. यानंतर १० मार्च २०२६ रोजी संबंधित संशयितांविरुद्ध आवश्यक कागदपत्रे तयार करून त्यांना प्रथम वर्ग न्यायालय, नवापूर येथे हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना १३ मार्च २०२६ पर्यंत चार दिवसांची वनकोठडी सुनावली आहे.
या प्रकरणी चिंचपाडा येथील वनरक्षकांनी गुन्हा नोंदवला असून वनपाल कामोद पुढील तपास करत आहेत. सदर कारवाई वनसंरक्षक निनू सोमराज (धुळे), उपवनसंरक्षक संतोष सस्ते (नंदुरबार), विभागीय वनाधिकारी दक्षता विभाग धुळे राजेंद्र सदगीर तसेच सहाय्यक वनसंरक्षक रोशन बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल प्राशा पगार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
या कारवाईत वनपाल कामोद, एस. डी. बडगुजर, युवराज भाबड, वनरक्षक सतीश पदमर, दीनानाथ कोकणी, रामदास पावरा, इलान गावित, अमोल डी. गावित, देवमन सूर्यवंशी, शिवराम गावित, अनिल पावरा तसेच वनमजूर बाळा गावित, फिलिप गावित, कांतीलाल गावित, फिलिप सखाराम गावित आणि वाहनचालक चमाऱ्या गावित यांनी सहभाग घेतला.

.jpeg)


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा