दोंडाईचा येथील घरफोडी प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीस मुद्देमालासह अटक करून गुन्ह्याचा उलगडा केला आहे.

धुळे जि.प्रतिनिधी : राज सोनवणे 

दि. 29 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 4 ते रात्री 8.30 वाजेदरम्यान फिर्यादी ओमप्रकाश पंडीत सोनवणे (रा. राऊळ नगर, संतोषी माता मंदिराजवळ, दोंडाईचा) यांच्या राहत्या घरातून अज्ञात चोरट्याने सुमारे 47 हजार रुपयांचे सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरी केली होती. याप्रकरणी दोंडाईचा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 93/2026 नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 305 (अ), 331 (3), 331 (4) अंतर्गत घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.


या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा, धुळे करीत असताना दि. 13 मार्च 2026 रोजी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गोपनीय माहिती मिळाली की, या गुन्ह्यातील आरोपी राजगुरु मोहन पाटील (वय 20, रा. महादेवपुरा, दोंडाईचा ता. शिंदखेडा जि. धुळे) हा चोरीचा मुद्देमाल विक्रीसाठी दोंडाईचा येथील नंदुरबार चौफुली परिसरात थांबलेला आहे.

माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. सखोल चौकशीत त्याने घरफोडी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून सुमारे 18 हजार रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले. यामध्ये 2.510 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, नथ, 3.60 ग्रॅम वजनाचे एअर रिंग आणि 1.2 ग्रॅम वजनाचे पेंडल यांचा समावेश आहे. 

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी तसेच पोलीस अंमलदार प्रशांत चौधरी, चेतन बोरसे, संतोष हिरे, विनायक खैरनार, कमलेश सूर्यवंशी आणि हर्षल चौधरी यांच्या पथकाने केली.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

टोकरतलाव ता.जि.नंदुरबार येथे महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन

शिरपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

अक्राणी तालुक्यात भ्रष्टाचाराच्या आरोपावरून ग्रामपंचायती विरोधात आमरण उपोषण