शिरपूर येथे युवा संघर्ष पार्टी महाराष्ट्र राज्य कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात.
शिरपूर ता प्रतिनिधी : राज सोनवणे
शिरपूर येथे युवा संघर्ष पार्टी महाराष्ट्र राज्य कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात. युवकांच्या व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणारी आणि तरुणांना संघटित करण्याचे कार्य करणारी युवा संघर्ष पार्टीच्या महाराष्ट्र राज्य कार्यालयाचे उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला. या पक्षाचे मुख्य उद्दिष्ट युवकांना सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात संधी उपलब्ध करून देणे तसेच युवकांच्या हक्कांसाठी संघर्ष करणे हे आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन आपा साहेब शिरसाठ यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला युवा संघर्ष पार्टी महिला मोर्चाच्या धुळे जिल्हाध्यक्ष मंदा मालचे यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पाटील सर यांच्यासह हंसराज चौधरी, राकेश माली, कैलाश माली, महेश पाटील आणि जगदीश महाजन हे मान्यवर उपस्थित होते.



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा