पोस्ट्स

धुळ्यात सरकारी नोकरीच्या नावाखाली ७८ लाखांचा महाघोटाळा; १३ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

इमेज
धुळे प्रतिनिधी :  धुळे: सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांना लक्ष्य करून त्यांना बनावट नियुक्तीपत्रे देत लाखो रुपयांचा गंडा घालणारी एक मोठी टोळी धुळ्यात सक्रिय असल्याचे उघड झाले आहे. दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये तब्बल ७८ लाख ७४ हजार ५०० रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याप्रकरणी धुळे शहरातील दोन पोलीस ठाण्यांत एकूण १३ संशयितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिली घटना चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. अंबिका नगरमधील एका तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार, मे २०२३ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत संशयितांनी फिर्यादीचा भाऊ वेदांत आणि त्याच्या मित्रांना आरोग्य विभाग, आयकर विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. विश्वास संपादन करण्यासाठी संशयितांनी चक्क टपालाद्वारे बनावट नियुक्तीपत्रे पाठवली. या बदल्यात वेदांत मोराणकर यांच्याकडून ऑनलाइन ३९ लाख ७४ हजार ५०० आणि रोख २२ लाख असे एकूण ६१ लाख ७४ हजार ५०० रुपये उकळण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी ८ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये (३१८, ३३६, ३४० इ.) गुन्हा नोंदवला आहे. द...

माणुसकीचा झरा आटलेला नाही १० लाखांचे सोने सापडले अन् मूळ मालकाला सुपूर्द सोनगीरच्या 'बंडू नानां'चा प्रामाणिकपणा

इमेज
सोनगीर: "आजच्या युगात माणूस पैशांसाठी माणुसकी विसरत चालला आहे," असे म्हटले जात असतानाच धुळे जिल्ह्यातील सोनगीर फाट्यावर एका घटनेने या विधानाला छेद दिला आहे. रस्त्यावर पडलेले तब्बल १० लाख रुपये किमतीचे ७ तोळे सोन्याचे दागिने एका दुकानदाराने पूर्ण प्रामाणिकपणे मूळ मालकाला परत केले. 'साई कोल्ड्रिंक्स'चे मालक प्रशांत देशमुख (उर्फ बंडू नाना) यांनी दाखवलेल्या या अजोड प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत असून, "खरोखर देव माणसातच असतो," याची प्रचिती नागरिकांना आली आहे. बँकेचे काम न झाल्याने परतताना घडली घटना मिळालेल्या माहितीनुसार, शिंदखेडा तालुक्यातील चिमठावळ येथील शेतकरी राजेंद्र परबत सूर्यवंशी हे आपल्याकडील ७ तोळे सोने घेऊन नरडाणा येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत 'गोल्ड लोन' घेण्यासाठी गेले होते. मात्र, बँकेत तांत्रिक ऑडिट सुरू असल्याने त्यांच्या कर्जाची प्रक्रिया होऊ शकली नाही. त्यामुळे विषण्ण मनाने ते पुन्हा आपल्या गावाकडे परतत होते. परतीच्या प्रवासात सोनगीर गावातून भाजीपाला घेत असताना, सोनगीर-दोंडाईचा रस्त्यावर त्यांच्या मोटारसायकलला लावलेली पिशवी अचानक...

विखरण येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी; विद्यार्थ्यांमध्ये नवचेतनेची जागृती..

इमेज
विखरण (ता. शिरपूर, जि. धुळे) येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट), कै. भाईदास आप्पा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था विखरण, राजमाता जिजाऊ सार्वजनिक संस्था विखरण तसेच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जन्मजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सत्यशोधक समाज, धुळेचे सुरेश झाल्टे सर उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी स्वराज्य स्थापनेची प्रेरणा, शेतकरी-शेतमजूर व महिलांवरील अन्याय-अत्याचार, राजेशाही व्यवस्था, “राजा रयतेसाठी व रयत राज्यासाठी” ही संकल्पना, मातृसत्ताक व्यवस्थेचे फायदे, शेतकऱ्यांसाठीची शिवनीती तसेच वर्तमान शासन व्यवस्था या विविध विषयांना स्पर्श करत उपस्थितांची मने जिंकली. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित घोषवाक्ये देत नागरिकांमध्ये नवचेतना व जागृती निर्माण केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सरपंच प्रविण जगन्नाथ पाटील यांनी केले. प्रस्तावना दिलीप भाईदास पाटील (विधानसभा क्षेत्र तालुका अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार गट...

बलकुवे शिवजयंतीत जयाबाई दिलीप पाटील यांनी “लाडक्या बहिणी” योजनेतील ११,००० रु. शाळेला देण्याची घोषणा केली.

इमेज
 शिरपूर  प्रतिनिधी   बलकुवे  ता. शिरपूर या गावात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमादरम्यान जयाबाई दिलीप पाटील यांनी त्यांना मिळणारे “लाडक्या बहिणी” योजनेतील 11,000 रु गावातील जिल्हा परिषद शाळेला देण्याचा निर्णय जाहीर केला. त्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे ग्रामस्थांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेश झाल्टे होते. त्यांचा सत्कार किशोर पाटील (उपसरपंच) यांनी केला. तसेच जयाबाई दिलीप पाटील यांचा सत्कार आशाबाई विनोद पाटील यांनी, तर दिलीप भाईदास पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. शरद पवार गट, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष) यांचा सत्कार सुभाष पाटील यांनी केला. कार्यक्रमास आधार पाटील, राजेंद्र पाटील, राकेश पाटील, बापू रावण पाटील, ज्ञानेश्वर कोळी, अ‍ॅड. रोहित पाटोळे, सुनील शिरसाठ, राहुल पाटील, भुषण पाटील, राकेश माळी (शिरपूर) आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन अजय शिरसाठ यांनी केले.

अक्राणी तालुक्यात भ्रष्टाचाराच्या आरोपावरून ग्रामपंचायती विरोधात आमरण उपोषण

इमेज
अक्राणी तालुका प्रतिनिधी :   अक्राणी :- अक्राणी तालुक्यातील मोडलगाव ग्रामपंचायत तसेच इतर काही ग्रामपंचायतींमध्ये झालेल्या कथित भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी मोडलगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येणार आहे. या संदर्भात संबंधित उपोषणकर्त्यांनी जिल्हा परिषद नंदुरबार, जिल्हाधिकारी नंदुरबार, जिल्हा पोलीस अधीक्षक नंदुरबार, गटविकास अधिकारी अक्राणी तसेच म्हसावद पोलीस ठाणे यांना निवेदन सादर केले आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सदर ग्रामपंचायतींमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराबाबत वेळोवेळी लेखी तक्रारी व पत्रव्यवहार करूनही आजपर्यंत कोणतीही ठोस चौकशी करण्यात आलेली नाही. त्यामुळे नाईलाजाने आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याचे उपोषणकर्त्यांनी स्पष्ट केले आहे. उपोषणकर्ते दिलवर पाडवी यांनी सांगितले की, संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी होईपर्यंत आणि दोषींवर कारवाई केली जात नाही, तोपर्यंत हे आमरण उपोषण मागे घेतले जाणार नाही, असा ठाम इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे.

शिरपूर तालुक्यात आजपासून ‘भूमिपुत्र शेतकरी संघर्ष यात्रेला’ सुरुवात

इमेज
शिरपूर तालुक्यात आजपासून ‘भूमिपुत्र शेतकरी संघर्ष यात्रेला’ सुरुवात शिरपूर प्रतिनिधी ,शेतकरी व आदिवासी प्रश्नांसाठी विविध संघटनांचा संयुक्त एल्गार शिरपूर तालुक्यातील शेतकरी, आदिवासी व कष्टकरी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार पक्ष), भारतीय सामाजिक हक्क व न्याय अधिकार संघ, भारतीय समाज सेवा संघ तसेच एकलव्य आदिवासी क्रांतिकारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आजपासून ‘भूमिपुत्र शेतकरी संघर्ष यात्रा’ सुरू होत आहे. दि. 12 जानेवारी 2026 रोजी या संघर्ष यात्रेचा प्रारंभ होणार असून, दि. १ फेब्रुवारी 2026 रोजी शिरपूर तालुक्यातील पाचकंदील, शिरपूर (जि. धुळे) येथे भव्य समारोप होणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून शिरपूर तालुक्यातील शेतकरी व आदिवासी समाजाच्या ज्वलंत प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे. या संघर्ष यात्रेच्या प्रमुख मागण्यांमध्ये शिरपूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे सरसकट पंचनामे करून नुकसानभरपाई व कर्जमाफी द्यावी, रात्रपाळीची वीज बंद करून दिवसा वीजपुरवठा करावा, तसेच शेतमालाला हमीभाव मिळावा यांचा समावेश...

धुळे पोलिसांचा इशारा नायलॉन / चायनिज मांजाच्या विक्री-वापरावर कडक कारवाई व सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल होणार

इमेज
धुळे  प्रतिनिधी  आगामी मकर संक्रांती सणाच्या पार्श्वभूमीवर नायलॉन, चायनिज अथवा सिंथेटिक मांजाची अवैध विक्री, वाहतूक, साठवणूक व वापर करणाऱ्यांविरुद्ध अत्यंत कठोर कारवाई करण्यात येणार आहे. केवळ जप्तीपुरती मर्यादा न ठेवता, संबंधितांवर भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा (BNS कलम 110) गंभीर व अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा धुळे पोलिसांनी दिला आहे. पोलीस अधीक्षक धुळे, मा. श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना याबाबत स्पष्ट निर्देश दिले असून, नायलॉन अथवा चायनिज मांजा हा मानवी तसेच पशु-पक्ष्यांच्या जीवितास अत्यंत घातक असल्याने कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे नमूद करण्यात आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, नायलॉन मांजामुळे गळा चिरून मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटना यापूर्वी घडल्या आहेत. अशा परिस्थितीत, मांजाची विक्री करणाऱ्या विक्रेत्याला त्याचे घातक परिणाम माहिती असूनही नफ्यासाठी विक्री केल्यास तो गुन्हा सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाच्या व्याख्येत येतो. या गुन्ह्यासाठी १० वर्षांपर्यंत शिक्षा ...