पोस्ट्स

अक्राणी तालुक्यात भ्रष्टाचाराच्या आरोपावरून ग्रामपंचायती विरोधात आमरण उपोषण

इमेज
अक्राणी तालुका प्रतिनिधी :   अक्राणी :- अक्राणी तालुक्यातील मोडलगाव ग्रामपंचायत तसेच इतर काही ग्रामपंचायतींमध्ये झालेल्या कथित भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी मोडलगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येणार आहे. या संदर्भात संबंधित उपोषणकर्त्यांनी जिल्हा परिषद नंदुरबार, जिल्हाधिकारी नंदुरबार, जिल्हा पोलीस अधीक्षक नंदुरबार, गटविकास अधिकारी अक्राणी तसेच म्हसावद पोलीस ठाणे यांना निवेदन सादर केले आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सदर ग्रामपंचायतींमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराबाबत वेळोवेळी लेखी तक्रारी व पत्रव्यवहार करूनही आजपर्यंत कोणतीही ठोस चौकशी करण्यात आलेली नाही. त्यामुळे नाईलाजाने आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याचे उपोषणकर्त्यांनी स्पष्ट केले आहे. उपोषणकर्ते दिलवर पाडवी यांनी सांगितले की, संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी होईपर्यंत आणि दोषींवर कारवाई केली जात नाही, तोपर्यंत हे आमरण उपोषण मागे घेतले जाणार नाही, असा ठाम इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे.

शिरपूर तालुक्यात आजपासून ‘भूमिपुत्र शेतकरी संघर्ष यात्रेला’ सुरुवात

इमेज
शिरपूर तालुक्यात आजपासून ‘भूमिपुत्र शेतकरी संघर्ष यात्रेला’ सुरुवात शिरपूर प्रतिनिधी ,शेतकरी व आदिवासी प्रश्नांसाठी विविध संघटनांचा संयुक्त एल्गार शिरपूर तालुक्यातील शेतकरी, आदिवासी व कष्टकरी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार पक्ष), भारतीय सामाजिक हक्क व न्याय अधिकार संघ, भारतीय समाज सेवा संघ तसेच एकलव्य आदिवासी क्रांतिकारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आजपासून ‘भूमिपुत्र शेतकरी संघर्ष यात्रा’ सुरू होत आहे. दि. 12 जानेवारी 2026 रोजी या संघर्ष यात्रेचा प्रारंभ होणार असून, दि. १ फेब्रुवारी 2026 रोजी शिरपूर तालुक्यातील पाचकंदील, शिरपूर (जि. धुळे) येथे भव्य समारोप होणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून शिरपूर तालुक्यातील शेतकरी व आदिवासी समाजाच्या ज्वलंत प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे. या संघर्ष यात्रेच्या प्रमुख मागण्यांमध्ये शिरपूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे सरसकट पंचनामे करून नुकसानभरपाई व कर्जमाफी द्यावी, रात्रपाळीची वीज बंद करून दिवसा वीजपुरवठा करावा, तसेच शेतमालाला हमीभाव मिळावा यांचा समावेश...

धुळे पोलिसांचा इशारा नायलॉन / चायनिज मांजाच्या विक्री-वापरावर कडक कारवाई व सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल होणार

इमेज
धुळे  प्रतिनिधी  आगामी मकर संक्रांती सणाच्या पार्श्वभूमीवर नायलॉन, चायनिज अथवा सिंथेटिक मांजाची अवैध विक्री, वाहतूक, साठवणूक व वापर करणाऱ्यांविरुद्ध अत्यंत कठोर कारवाई करण्यात येणार आहे. केवळ जप्तीपुरती मर्यादा न ठेवता, संबंधितांवर भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा (BNS कलम 110) गंभीर व अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा धुळे पोलिसांनी दिला आहे. पोलीस अधीक्षक धुळे, मा. श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना याबाबत स्पष्ट निर्देश दिले असून, नायलॉन अथवा चायनिज मांजा हा मानवी तसेच पशु-पक्ष्यांच्या जीवितास अत्यंत घातक असल्याने कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे नमूद करण्यात आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, नायलॉन मांजामुळे गळा चिरून मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटना यापूर्वी घडल्या आहेत. अशा परिस्थितीत, मांजाची विक्री करणाऱ्या विक्रेत्याला त्याचे घातक परिणाम माहिती असूनही नफ्यासाठी विक्री केल्यास तो गुन्हा सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाच्या व्याख्येत येतो. या गुन्ह्यासाठी १० वर्षांपर्यंत शिक्षा ...

जी.टी.पी. कनिष्ठ महाविद्यालय नंदुरबारच्या एन.एस.एस. शिबिरात 'बाल हक्क व संरक्षण' या विषयावर जनजागृती..

इमेज
नंदुरबार (प्रतिनिधी): येथील जी.टी.पी. कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने 'टोकर तलाव' येथील आदिवासी अकॅडमीत आयोजित हिवाळी शिबिरात जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या वतीने विशेष मार्गदर्शन व जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून स्वयंसेवकांमध्ये श्रमप्रतिष्ठा, ग्रामीण जीवनाचा अनुभव आणि मानवी मूल्यांचा विकास व्हावा, या उद्देशाने या सात दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून दिनांक २९ डिसेंबर २०२५ रोजी विद्यार्थ्यांसाठी 'बाल संरक्षण' या विषयावर विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते. संविधान आणि बाल हक्कांचे मार्गदर्शन याप्रसंगी जिल्हा महिला व बाल विकास विभागांतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्री. गौतम वाघ यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणात खालील प्रमुख मुद्द्यांवर प्रकाश टाकला. घटनात्मक तरतुदी : भारतीय संविधानात मुलांसाठी असलेल्या विशेष तरतुदी आणि हक्कांची माहिती. कायदेविषयक ज्ञान: बाल न्याय अधिनियम (JJ Act), बालविवाह प्रतिबंध कायदा, ...

अक्कलकुवा पोलीस स्टेशन येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

इमेज
नंदुरबार (प्रतिनिधी): आज दिनांक २९ नोव्शाहेंबर २०२५ रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सिव्हिल हॉस्पिटल यांच्या वतीने अक्कलकुवा पोलीस स्टेशन येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. DYSP सुभाष भोये सर यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक सारंग नवलकर सर यांच्या पुढाकाराने या शिबिराच यशस्वी आयोजन झाले. पोलीस अधिकारी व कर्मचारी असे एकूण 22 लोकांनी रक्तदान केले. सामाजिक बांधिलकीची भावना दाखवत , "सध्या रुग्णांना रक्ताची आवश्यकता भासत आहे. अशा परिस्थितीत, पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सामाजिक जबाबदारी म्हणून या शिबिरात सक्रिय सहभाग घेतला, हे अत्यंत कौतुकास्पद आहे." रक्तदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलची टीम उपस्थित होती. यामध्ये डॉ.विजय खजोटिया शांततालाल कोकणी (समुपदेशन), विश्वनाथ वळवी (समुपदेशन), शांताराम गावित (प्रयोगशाळा तंत्रज्ञ), प्रितम मेंथेवाड (प्रयोगशाळा तंत्रज्ञ), जगनण पावरा (प्रयोगशाळा तंत्रज्ञ), कांतीलाल वसावे (प्रयोगशाळा तंत्रज्ञ), दिलीप वसावे (परिचर), विकास वसावे (परिचर) आणि अभिषेक वळवी (वाहनचालक) यांचा समावेश होता. त्यांच्यासह पोलीस स्ट...

टोकरतलाव ता.जि.नंदुरबार येथे महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन

इमेज
नंदुरबार ता. विशेष प्रतिनिधी इकोनेट ही संस्था नंदुरबार जिल्ह्यात संविधान जाणीव जागृतीचे काम करते. समाजामध्ये संविधान साक्षरता निर्माण करण्यासाठी इकोनेट संस्थेमार्फत काही फेलो ची नियुक्ती करण्यात आली आहे. नंदुरबार तालुक्यात अर्चना गावित आणि प्रतीक्षा वाघ हे समाजातील विविध गटांसोबत संविधान जाणीव जागृती चे कार्यक्रम करत असतात.  आज 28 नोव्हेंबर म्हणजे बहुजनांचा खरा शिक्षक दिन, अर्थात महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृतिदिन इकोनेट फेलो अर्चना गावित यांनी कार्यक्षेत्रातील महिलांसह महात्मा फुले यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले. आज संविधान दिनानिमित्त कार्यक्षेत्र टोकरतलाव या गावामध्ये गटातील महिलांसोबत संविधान दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला, सर्वप्रथम सर्व महिलांचे कार्यक्रमासाठी स्वागत करण्यात आले, त्यानंतर महिलांनी  महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर  थोर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या  प्रतिमेला पुष्प अर्पण करून प्रतिमा पूजन करण्यात आले,  महिलांना संविधान निर्मिती प्रक्रियेबद्दल माहिती देण्यात आली,  संविधान निर्मितीसाठी विविध समित्यांची आणि त्यानंतर मसुदा समितीची...

तळोदा निवडणूक जिंकल्यास मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विजय सोहळा साजरा करण्यासाठी येणार तळोदा शहरात.

इमेज
विशेष प्रतिनिधी तळोदा  तळोदा – दिनांक २७ /११/ २०२५ रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तळोद्यात जाहीर सभा आयोजित केली होती . नगरविकास विभागाच्या विविध योजनांमुळे शहरांच्या प्रगतीला नवे बळ मिळत असून, या योजनांचा व्यापक फायदा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचत आहे. महिलांच्या सबलीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या विशेष उपक्रमांमुळे येणाऱ्या काळात शहरांचा विकास अधिक वेगाने होणार असल्याचे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तळोद्यात व्यक्त केले. तळोद्यात आयोजित  जाहीर सभेत बोलताना शिंदे म्हणाले की, “लाडकी बहिण योजना” या माध्यमातून लाखो महिलांना आर्थिक दिलासा मिळत आहे. योजनेबाबत अफवा पसरवून विरोधक दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असले तरीही ही योजना बंद होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. सभेला आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार आशा पाडवी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती लाभली. ग्रामीण व शहरी भागातील महिलांसाठी बचत गट निर्माण करून त्यांना नगरविकास मंत्रालयाकडून शाश्वत निधी उपलब्ध करून देण्याच्या योजना सरकारद्वारे राबवल्या जात असल्याचेही शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, तळोदा नगरपालिका निवडणुकीत...