जी.टी.पी. कनिष्ठ महाविद्यालय नंदुरबारच्या एन.एस.एस. शिबिरात 'बाल हक्क व संरक्षण' या विषयावर जनजागृती..
नंदुरबार (प्रतिनिधी):
येथील जी.टी.पी. कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने 'टोकर तलाव' येथील आदिवासी अकॅडमीत आयोजित हिवाळी शिबिरात जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या वतीने विशेष मार्गदर्शन व जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून स्वयंसेवकांमध्ये श्रमप्रतिष्ठा, ग्रामीण जीवनाचा अनुभव आणि मानवी मूल्यांचा विकास व्हावा, या उद्देशाने या सात दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून दिनांक २९ डिसेंबर २०२५ रोजी विद्यार्थ्यांसाठी 'बाल संरक्षण' या विषयावर विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी जिल्हा महिला व बाल विकास विभागांतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्री. गौतम वाघ यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणात खालील प्रमुख मुद्द्यांवर प्रकाश टाकला.
घटनात्मक तरतुदी: भारतीय संविधानात मुलांसाठी असलेल्या विशेष तरतुदी आणि हक्कांची माहिती.
कायदेविषयक ज्ञान: बाल न्याय अधिनियम (JJ Act), बालविवाह प्रतिबंध कायदा, बालकामगार प्रतिबंध कायदा आणि पोक्सो (POCSO) कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदी.
बाल संरक्षण यंत्रणा: संकटग्रस्त बालकांसाठी कार्यरत असणारी बाल न्याय यंत्रणा आणि शासनाच्या विविध कल्याणकारी योजना विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करताना श्री. वाघ यांनी सामाजिक परिवर्तनासाठी तरुणांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी उपस्थित सर्व स्वयंसेवकांनी आणि मान्यवरांनी 'बालविवाह मुक्त समाज' घडवण्यासाठी बालविवाह विरोधी सामूहिक प्रतिज्ञा घेतली.
या प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक श्री. मनोज शेवाळे, श्री. ठाकरे सर, चाईल्ड हेल्पलाईनचे श्री. नरेश पावरा यांच्यासह स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयीन चमूने विशेष परिश्रम घेतले.


.jpeg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा