माणिकचंद नारायण काबरे विद्यालयात सायबर सुरक्षिततेबाबत जनजागृती
जळगाव : डिजिटल युगात वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षिततेबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि क्विक हील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ६ ऑगस्ट २०२६ रोजी सोनवद येथील माणिकचंद नारायण काबरे विद्यालयात सायबर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना इंटरनेटचा सुरक्षित वापर, ऑनलाइन फसवणुकीपासून बचाव तसेच डिजिटल माध्यमांचा जबाबदारीने वापर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. स्नेहल पाटील व वैष्णवी पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत सायबर गुन्ह्यांचे प्रकार आणि त्यापासून बचाव करण्यासाठी आवश्यक खबरदारी याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी ओटीपी फ्रॉड, क्यूआर कोड फसवणूक, ऑनलाइन बँकिंग फ्रॉड, एआय व्हॉइस कॉल फ्रॉड, सोशल मीडिया फसवणूक, बनावट लिंक, फिशिंग, मजबूत पासवर्ड आणि टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) याबाबत विद्यार्थ्यांना सोप्या उदाहरणांसह माहिती देण्यात आली. अनोळखी व्यक्तींना ओटीपी, बँक खात्याची माहिती किंवा वैयक्तिक माहिती देऊ नये, संशयास्पद...