पोस्ट्स

अक्कलकुवा पोलीस स्टेशन येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

इमेज
नंदुरबार (प्रतिनिधी): आज दिनांक २९ नोव्शाहेंबर २०२५ रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सिव्हिल हॉस्पिटल यांच्या वतीने अक्कलकुवा पोलीस स्टेशन येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. DYSP सुभाष भोये सर यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक सारंग नवलकर सर यांच्या पुढाकाराने या शिबिराच यशस्वी आयोजन झाले. पोलीस अधिकारी व कर्मचारी असे एकूण 22 लोकांनी रक्तदान केले. सामाजिक बांधिलकीची भावना दाखवत , "सध्या रुग्णांना रक्ताची आवश्यकता भासत आहे. अशा परिस्थितीत, पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सामाजिक जबाबदारी म्हणून या शिबिरात सक्रिय सहभाग घेतला, हे अत्यंत कौतुकास्पद आहे." रक्तदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलची टीम उपस्थित होती. यामध्ये डॉ.विजय खजोटिया शांततालाल कोकणी (समुपदेशन), विश्वनाथ वळवी (समुपदेशन), शांताराम गावित (प्रयोगशाळा तंत्रज्ञ), प्रितम मेंथेवाड (प्रयोगशाळा तंत्रज्ञ), जगनण पावरा (प्रयोगशाळा तंत्रज्ञ), कांतीलाल वसावे (प्रयोगशाळा तंत्रज्ञ), दिलीप वसावे (परिचर), विकास वसावे (परिचर) आणि अभिषेक वळवी (वाहनचालक) यांचा समावेश होता. त्यांच्यासह पोलीस स्ट...

टोकरतलाव ता.जि.नंदुरबार येथे महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन

इमेज
नंदुरबार ता. विशेष प्रतिनिधी इकोनेट ही संस्था नंदुरबार जिल्ह्यात संविधान जाणीव जागृतीचे काम करते. समाजामध्ये संविधान साक्षरता निर्माण करण्यासाठी इकोनेट संस्थेमार्फत काही फेलो ची नियुक्ती करण्यात आली आहे. नंदुरबार तालुक्यात अर्चना गावित आणि प्रतीक्षा वाघ हे समाजातील विविध गटांसोबत संविधान जाणीव जागृती चे कार्यक्रम करत असतात.  आज 28 नोव्हेंबर म्हणजे बहुजनांचा खरा शिक्षक दिन, अर्थात महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृतिदिन इकोनेट फेलो अर्चना गावित यांनी कार्यक्षेत्रातील महिलांसह महात्मा फुले यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले. आज संविधान दिनानिमित्त कार्यक्षेत्र टोकरतलाव या गावामध्ये गटातील महिलांसोबत संविधान दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला, सर्वप्रथम सर्व महिलांचे कार्यक्रमासाठी स्वागत करण्यात आले, त्यानंतर महिलांनी  महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर  थोर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या  प्रतिमेला पुष्प अर्पण करून प्रतिमा पूजन करण्यात आले,  महिलांना संविधान निर्मिती प्रक्रियेबद्दल माहिती देण्यात आली,  संविधान निर्मितीसाठी विविध समित्यांची आणि त्यानंतर मसुदा समितीची...

तळोदा निवडणूक जिंकल्यास मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विजय सोहळा साजरा करण्यासाठी येणार तळोदा शहरात.

इमेज
विशेष प्रतिनिधी तळोदा  तळोदा – दिनांक २७ /११/ २०२५ रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तळोद्यात जाहीर सभा आयोजित केली होती . नगरविकास विभागाच्या विविध योजनांमुळे शहरांच्या प्रगतीला नवे बळ मिळत असून, या योजनांचा व्यापक फायदा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचत आहे. महिलांच्या सबलीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या विशेष उपक्रमांमुळे येणाऱ्या काळात शहरांचा विकास अधिक वेगाने होणार असल्याचे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तळोद्यात व्यक्त केले. तळोद्यात आयोजित  जाहीर सभेत बोलताना शिंदे म्हणाले की, “लाडकी बहिण योजना” या माध्यमातून लाखो महिलांना आर्थिक दिलासा मिळत आहे. योजनेबाबत अफवा पसरवून विरोधक दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असले तरीही ही योजना बंद होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. सभेला आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार आशा पाडवी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती लाभली. ग्रामीण व शहरी भागातील महिलांसाठी बचत गट निर्माण करून त्यांना नगरविकास मंत्रालयाकडून शाश्वत निधी उपलब्ध करून देण्याच्या योजना सरकारद्वारे राबवल्या जात असल्याचेही शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, तळोदा नगरपालिका निवडणुकीत...

शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी एसटीची हेल्पलाइन सुरु — १८०० २२१ २५१

इमेज
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) कडून शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी एक महत्त्वपूर्ण सुविधा सुरु करण्यात आली आहे. आता विद्यार्थ्यांच्या प्रवासादरम्यान उद्भवणाऱ्या अडचणी, सुरक्षा, तक्रारी किंवा सूचना यासाठी विशेष हेल्पलाइन सेवा उपलब्ध करण्यात आली असून, तिचा क्रमांक आहे: 📞 १८०० २२१ २५१   ही हेल्पलाइन विद्यार्थ्यांच्या सुरक्षित आणि सुगम प्रवासासाठी तत्पर राहणार असून, एसटी विभागाकडून या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना अधिक सुरक्षित, विश्वासार्ह व सुविधायुक्त सेवा देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. एसटी बस सेवेतून दररोज हजारो विद्यार्थी शाळा-कॉलेजला जातात. त्यामध्ये वेळेचे नियोजन, गाडीची उपलब्धता, रूट संबंधित तक्रारी, पाससंदर्भातील माहिती इत्यादीसाठी ही हेल्पलाइन उपयुक्त ठरणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने विद्यार्थ्यांनी या सेवेचा योग्य उपयोग करून प्रवास अधिक सुरक्षित व सोयीचा करण्याचे आवाहन केले आहे. 

शिंदखेडा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भव्य प्रचार सभा उत्साहात संपन्न

इमेज
शिंदखेडा ता. प्रतिनिधी एस. आर. धिवरे  नगरपंचायतीतील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत नगराध्यक्ष व सर्व प्रभागांतील नगरसेवक पदांसाठी भव्य प्रचार सभेचे आयोजन काल मोठ्या उत्साहात करण्यात आले. शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून या सभेला अपूर्व प्रतिसाद दिला. सभेला उपस्थित राहून मार्गदर्शन करणाऱ्या मान्यवरांमध्ये आमदार व पक्षाच्या प्रवक्त्या सना ताई मलिक, प्रदेश सरचिटणीस सूरज जी चव्हाण, जिल्हाध्यक्ष सुरेश अण्णा सोनवणे, प्रवक्ते शाम जी सानेर, माजी आमदार रामकृष्ण जी पाटील, इद्रीस जी कुरेशी, जोसेफ जी मलबारी, सुमित जी पवार, सलीम जी मिस्त्री, सुभाष माळी, प्रकाश चौधरी, उमाकांत देसले, दीपक जगताप, गोलू देसले, दिलीप भामरे, नीलेश पाटील, रविंद्र मालचे, राहुल पाटील, अर्जुन भील, भगवान मराठे आदी मान्यवरांचा मोठ्या उत्साहात सहभाग होता. नेतृत्वाचे मार्गदर्शन, जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि कार्यकर्त्यांची अखंड एकता यामुळे सभा अत्यंत यशस्वी झाली. विविध मान्यवरांनी शिंदखेडा नगरपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी स्पष्ट दिशा व धोरणे मांडली. शहरातील प्रत्येक घटकाप...

धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात सहाय्यक आयुक्त समाज कल्याण धुळे यांच्या वतीने संविधान अमृत महोत्सव व “घर-घर संविधान” उपक्रमाचा शुभारंभ

इमेज
धुळे ता विशेष प्रतिनिधी :    जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात २६ नोव्हेंबर दुपारी चार वाजता संविधान अमृत महोत्सव तसेच “घर-घर संविधान” या महत्त्वपूर्ण जनजागृती उपक्रमाचा औपचारिक शुभारंभ उत्साहात पार पडला. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग धुळे यांच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम सामाजिक न्याय आणि संविधानिक मूल्ये जनमानसात दृढ करण्याच्या उद्देशाने घेण्यात आला. या प्रसंगी प्रमुख उपस्थित म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी मा. श्री. संजय बागडे यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. तसेच अॅड. राहुल वाघ यांनी संविधानातील मूलभूत अधिकार, कर्तव्ये आणि सर्वसामान्य नागरिकांवर येणाऱ्या जबाबदाऱ्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी संविधानाचा दैनंदिन जीवनाशी असलेला संबंध स्पष्ट करत समाजात संवैधानिक मूल्यांची जाणीव वाढविण्याची गरज अधोरेखित केली. कार्यक्रमात सामाजिक न्याय विभागांतर्गत विविध महामंडळांचे अधिकारी, कर्मचारी, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती धुळे येथील अधिकारी कर्मचारी, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक, बहुजन कल्याण अधिकारी, तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडक...

इकोनेट संस्थेच्या माध्यमातून दुधाडे तालुका जिल्हा नंदुरबार येथे संविधान दिन साजरा करण्यात आला.

इमेज
नंदुरबार ता. विशेष प्रतिनिधी :  इकोनेट संस्थेच्या माध्यमातून दुधाडे तालुका जिल्हा नंदुरबार येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. इकोनेट संस्थेच्या माध्यमातून नंदुरबार जिल्ह्यामध्ये संविधान जाणीव जागृती करण्याचे काम सुरू आहे. त्या अनुषंगाने दिनाक 26.11.2025 रोजी दुधाडे येथील अंगणवाडी केंद्रात कार्यक्रम संपन्न झाला.  नंदुरबारच्या इकोनेट संस्थेच्या फेलो प्रतीक्षा वाघ यांनी अंगणवाडी सेविका सुजाता पवार यांच्या मदतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.  संविधान दिनानिमित्त इकोनेट संविधान फेलो प्रतीक्षा वाघ यांनी, भारतीय संविधान आणि महिला या विषयावर महिलांना माहिती दिली. भारतीय संविधान निर्माण करण्यामध्ये 15 महिलांचा देखील सहभाग होता, भारतीय संविधानामुळे भारतीय महिलांचा खऱ्या अर्थाने पुनर्जन्म झाला आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून लिंग आधारित भेद नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि त्या अनुषंगाने भारतीय संविधान कलम 15 मध्ये तरतूद केली की धर्म जात लिंग  आणि जन्मस्थान यावरून भेदभाव केला जाणार नाही. लिंगाच्या आधारावर होणारा भेदभाव संविधानाने नाकारला....