विखरण येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी; विद्यार्थ्यांमध्ये नवचेतनेची जागृती..
विखरण (ता. शिरपूर, जि. धुळे) येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट), कै. भाईदास आप्पा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था विखरण, राजमाता जिजाऊ सार्वजनिक संस्था विखरण तसेच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जन्मजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सत्यशोधक समाज, धुळेचे सुरेश झाल्टे सर उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी स्वराज्य स्थापनेची प्रेरणा, शेतकरी-शेतमजूर व महिलांवरील अन्याय-अत्याचार, राजेशाही व्यवस्था, “राजा रयतेसाठी व रयत राज्यासाठी” ही संकल्पना, मातृसत्ताक व्यवस्थेचे फायदे, शेतकऱ्यांसाठीची शिवनीती तसेच वर्तमान शासन व्यवस्था या विविध विषयांना स्पर्श करत उपस्थितांची मने जिंकली.
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित घोषवाक्ये देत नागरिकांमध्ये नवचेतना व जागृती निर्माण केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सरपंच प्रविण जगन्नाथ पाटील यांनी केले. प्रस्तावना दिलीप भाईदास पाटील (विधानसभा क्षेत्र तालुका अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार गट) यांनी केली.
प्रमुख पाहुणे म्हणून वासुदेव दिनकर पाटील (संत तुकाराम महाराज भजनी मंडळ, विखरण), राजेंद्र साहेबराव पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार गट), मनोहर पाटील (शिरपूर), डॉ. नितीन पाटील (संभाजी ब्रिगेड, शिरपूर), विजय नारायण पाटील (संचालक वि.वि.थ. कार्यकारी सोसायटी, विखरण), किरण मधुकर पाटील, जितेंद्र कांतीलाल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. गावातील नागरिक, विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली.

.jpeg)

छान
उत्तर द्याहटवा