टोकरतलाव ता.जि.नंदुरबार येथे महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन

नंदुरबार ता. विशेष प्रतिनिधी
इकोनेट ही संस्था नंदुरबार जिल्ह्यात संविधान जाणीव जागृतीचे काम करते. समाजामध्ये संविधान साक्षरता निर्माण करण्यासाठी इकोनेट संस्थेमार्फत काही फेलो ची नियुक्ती करण्यात आली आहे. नंदुरबार तालुक्यात अर्चना गावित आणि प्रतीक्षा वाघ हे समाजातील विविध गटांसोबत संविधान जाणीव जागृती चे कार्यक्रम करत असतात. 

आज 28 नोव्हेंबर म्हणजे बहुजनांचा खरा शिक्षक दिन, अर्थात महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृतिदिन इकोनेट फेलो अर्चना गावित यांनी कार्यक्षेत्रातील महिलांसह महात्मा फुले यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले.

आज संविधान दिनानिमित्त कार्यक्षेत्र टोकरतलाव या गावामध्ये गटातील महिलांसोबत संविधान दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला, सर्वप्रथम सर्व महिलांचे कार्यक्रमासाठी स्वागत करण्यात आले, त्यानंतर महिलांनी  महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर  थोर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या  प्रतिमेला पुष्प अर्पण करून प्रतिमा पूजन करण्यात आले,  महिलांना संविधान निर्मिती प्रक्रियेबद्दल माहिती देण्यात आली, 

संविधान निर्मितीसाठी विविध समित्यांची आणि त्यानंतर मसुदा समितीची स्थापना 9 डिसेंबर 1946 ते 26 नोव्हेंबर 1949 पर्यंतचा, मसुदा तयार करण्याचा कालखंड, मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली अथांग परिश्रम आणि मेहनतीने भारतीय राज्यघटना तयार करण्यात आली, तसेच  संविधानाने बहाल केलेली मूलभूत अधिकार, मूलभूत कर्तव्य, याबद्दलची आपली एक भारतीय नागरिक म्हणून आपली जबाबदारी कोणती असावी याबद्दल माहिती देण्यात आली, 

त्याचबरोबर आज दिनांक 28 नोव्हेंबर महान समाज सुधारक शिक्षणप्रणेते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्ताने भारतीय समाजाला, अंधश्रद्धा, जातीभेद, अनिष्ट रूढी परंपरा यांचा विरोध, स्त्री व दलितांच्या शिक्षणासाठी लढणारे भारतीय समाज सुधारक यांच्या विचारांनी स्त्रियांना समाजात समता व न्याय यांची बीज रोवण्याचे कार्य मानव धर्म आणि समतेची संकल्पना यातून समाजाला घडविण्यासाठी कार्य केले त्याबद्दल माहिती देण्यात आली व अशा प्रकारे नियोजित कार्यक्रम करण्यात आला.
या कार्यक्रमात गणेशा प्रमोद गावित, मनीषा अविनाश गावित, सुनिता परमेश्वर गावित, गंगा दीपक गावित, चंदना विलास गावित, भारती प्रवीण गावित, अनिता उमेश गावित, अनिशा आशिष गावित, पार्वती योगेश गावित, सुगना अजित गावित, प्रीती अरविंद गावित, आरती जगन्नाथ गावित, मंगला अर्जुन गावित, अनिता अल्ताफसिंग गावीत, सुनिता संदीप गावित, उपस्थित होते.



टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिरपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

अक्राणी तालुक्यात भ्रष्टाचाराच्या आरोपावरून ग्रामपंचायती विरोधात आमरण उपोषण